लंडनमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना! दोन भारतीय उद्योगपतींचे पाकिस्तानी महापौरांना आव्हान

Mayor Of London: सध्या लंडनचे महापौर पाकिस्तानी वंशाचे सादिक खान आहेत. पण आता पाकिस्तानी सादिक खान यांना भारतीयांच्या म्हणजेच भारतीयांकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
London Mayor Election
London Mayor Election
Published on
Updated on

Pakistani origin Mayor of London Sadiq Khan has to face a tough challenge from Indians in election:

सध्या लंडनचे महापौर पाकिस्तानी वंशाचे सादिक खान आहेत. पण आता पाकिस्तानी सादिक खान यांना भारतीयांच्या म्हणजेच भारतीयांकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

दोन भारतीय वंशाचे उद्योजक महापौरपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. लंडनच्या महापौरपदासाठी २ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये भारतीय वंशाचे दोन उद्योजक अपक्ष म्हणून महापौरपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.

लंडनच्या महापौरपदासाठी पाकिस्तानी वंशाच्या सादिक खान यांना आव्हान देणारे दोन भारतीय उद्योगपती आहेत. व्यापारी तरुण गुलाटी असे त्यांचे नाव आहे. ते 63 वर्षांचे आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी भारताला भेट दिली होती, ज्या दरम्यान त्यांनी महापौरपदाची मोहीम सुरू केली होती.

दुसरे उमेदवार 62 वर्षीय व्यापारी श्याम भाटिया आहेत. तेही निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. यासह सुमारे डझनभर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

London Mayor Election
Nigeria: नायजेरियात नरसंहार, गोळीबारात 50 ठार

गुलाटी यांच्याबद्दल बोलयचे झाले तर, गुलाटी यांचे घोषवाक्य 'ट्रस्ट अँड डेव्हलपमेंट' आहे. तर भाटिया यांनी ‘मेसेंजर ऑफ होप’ असा नारा दिला आहे.

ते म्हणाले, 'मी लंडनचा पुढील महापौर होण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे कारण मला पक्षाची विचारधारा आणि पक्षपात न करता विचार आणि धोरणांच्या मुक्त प्रवाहाला प्रोत्साहन द्यायचे आहे. मी लोकांची मते जाणून घेत आहे आणि त्यानुसार शक्य असेल तिथे निर्णय प्रक्रियेत लोकांना सहभागी करून घेण्याचे काम करेन.'

London Mayor Election
NATO on Ukraine: नाटोनं वाढवलं रशियाचं टेन्शन, युक्रेनसाठी तिजोरी उघडली; 1.2 अब्ज डॉलर्सची देणार शस्त्रे

भारतात महापौरपदाची मोहीम सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता, गुलाटी म्हणाले, 'भारत हे माझे जन्मस्थान आहे, जिथे माझा जन्म झाला आणि लंडन हे माझे कामाचे ठिकाण आहे, जिथे मी काम करतो.

भाटिया म्हणाले, 'शहरातील सध्याच्या परिस्थितीमुळे मी खूप चिंतेत आहे. निष्क्रीय धोरणांमुळे नागरिकांचे बळी जात असल्याचे पाहून मला वाईट वाटते.''

सादिक खान सध्या लंडनचे महापौर आहेत. 2016 पासून ते या पदावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com