NATO on Ukraine: नाटोनं वाढवलं रशियाचं टेन्शन, युक्रेनसाठी तिजोरी उघडली; 1.2 अब्ज डॉलर्सची देणार शस्त्रे

NATO on Ukraine: रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ युद्ध सुरु आहे. दरम्यान, नाटो युक्रेनला पूर्ण पाठिंबा देत आहे.
Vladimir Putin & Ukraine President
Vladimir Putin & Ukraine PresidentDainik Gomantak

NATO on Ukraine: रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ युद्ध सुरु आहे. दरम्यान, नाटो युक्रेनला पूर्ण पाठिंबा देत आहे. यामुळे रशियाची झोप उडाली आहे. यातच आता नाटो युक्रेनला $1.2 अब्ज किमतीची शस्त्रे देणार आहे. यामुळे युक्रेन अधिक शक्तिशाली होईल. याचा अर्थ हे युद्ध आत्ताच संपणार नाही. कारण रशिया हार मानणार नाही आणि युक्रेनला जी शस्त्रे मिळत आहेत त्यामुळे रशियाला तोंड देणे सोपे होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, नाटोने मंगळवारी घोषणा केली की त्यांनी तोफखाना खरेदी करण्यासाठी 1.1 अब्ज युरो म्हणजेच 1.2 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धापासून रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरु असताना नाटोकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 155 मिमी दारुगोळ्याच्या 2 लाख 20 हजार राउंड खरेदीला नाटोने ग्रीन सिग्नल दिला आहे. युक्रेनलाही यावेळी याची गरज आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, 'हा करार आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी, आमच्या स्वत:च्या शस्त्रास्त्रांचा साठा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.'

Vladimir Putin & Ukraine President
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, रशियन तेल डेपोचे मोठे नुकसान; पारंपारिक उत्सव रद्द!

नाटोचे सरचिटणीस म्हणाले की, ''युक्रेनमधील युद्ध हे दारुगोळ्याचे युद्ध बनले आहे. आम्ही राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हे युद्ध जिंकू देऊ शकत नाही. रशियाने हे युद्ध जिंकल्यास युक्रेनियन लोकांसाठी एक शोकांतिका असेल आणि आपल्या सर्वांसाठी धोकादायक असेल."

दोन्ही बाजूंच्या हल्ल्याचं गणित काय?

अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. नाटो युक्रेनला पूर्णपणे मदत करत असला तरी, सत्य हे देखील आहे की, युक्रेन अजूनही रशियाला तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम नाही. युक्रेनच्या हवाई संरक्षणाचा पराभव करण्यासाठी रशियाने अलिकडच्या आठवड्यात युक्रेनवर हवाई हल्ले वाढवले ​​आहेत. रशियाने 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 500 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com