

Pakistani Couple Crossed Ind-Pak Boarder: पूर्वीच्या काळात लोक प्रेमासाठी मृत्यूलाही कवटाळायचे, पण आता प्रेम मिळवण्यासाठी लोक कुटुंब आणि समाजाविरुद्ध जाऊन थेट देशाच्या सीमा (Borders) ओलांडत आहेत. याचेच एक ताजे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले. सीमा हैदरने सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारत गाठला. आता अशाच एका पाकिस्तानी जोडप्याने आपल्या प्रेमासाठी भारत-पाकिस्तानची सीमा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये (Gujarat) उघडकीस आला.
हे प्रकरण सीमा हैदरच्या प्रकरणापेक्षा थोडे वेगळे आहे, कारण इथे दोघेही पाकिस्तानी नागरिक असून ते घरातून पळून थेट भारतात आले.
प्रेमासाठी घर सोडून आलेले हे पाकिस्तानी जोडपे गुजरातच्या कच्छ भागातील वागाड (Vagad) परिसरातील खादिर बेटावरच्या रत्नापूर गावातील जंगलात भटकताना आढळले. हे अनोळखी जोडपे पाहून गाववाल्यांनी त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी आपण पाकिस्तानी असल्याचे सांगितले. या जोडप्याला पकडल्यानंतर सर्वात आश्चर्यकारक गोष्ट त्यांची अतिशय कमी असलेली लहान वये. पकडलेल्या मुलाचे वय 16 वर्षे तर मुलीचे वय 14 वर्षे असल्याचे समोर आले. तथापि, त्यांच्यापैकी कोणाकडेही नागरिकत्वाशी संबंधित कोणतेही अधिकृत पुरावे मिळाले नाहीत.
गाववाल्यांनी या अनोळखी पाकिस्तानी जोडप्याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांना हे जोडपे रत्नापूर गावातील एका मंदिरात आढळले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांनी सांगितले की, ते पाकिस्तानमधील (Pakistan) थारपारकर (Tharparkar) जिल्ह्यातले असून भील (Bhil) समुदायाचे आहेत. 'तुम्ही भारतात कसे आलात?' या प्रश्नावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, तारांचे कुंपण (Wire Fencing) खराब झाले होते, त्याच ठिकाणाहून त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला.
कच्छ पूर्वचे एसपी सागन यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, दोघांनीही घरात झालेल्या भांडणानंतर पळून आल्याचा दावा केला आहे. घरातून निघाल्यापासून ते जवळपास 4 दिवसांपूर्वी फक्त काही खाण्याचे सामान आणि 2 लिटर पाणी घेऊन पळाले होते. सध्या या जोडप्याकडे नागरिकत्वाचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी (Police) या संदर्भात तात्काळ सुरक्षा एजन्सींना माहिती दिली. पुढील तपास सुरु आहे. सुरक्षा एजन्सी त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि भारतात येण्याचा नेमका उद्देश तपासत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.