Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Terror Attack: दहशतवाद्यांच्या कथित उपस्थितीवर सुरक्ष दलांनी हे शोध अभियान (Search Operation) राबवले होते. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला.
Pakistan Terror Attack
Pakistan Terror AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ओरकझई जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि मेजरसह (Lieutenant Colonel and Major) एकूण 11 पाकिस्तानी सैनिक शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित दहशतवादी गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने घेतली.

पाकिस्तानी लष्कराची माध्यम शाखा इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दिलेल्या माहितीनुसार, 7-8 ऑक्टोबरच्या रात्री "फितना अल-खवारिज" या गटाशी संबंधित दहशतवाद्यांच्या कथित उपस्थितीवर सुरक्ष दलांनी हे शोध अभियान (Search Operation) राबवले होते. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला.

Pakistan Terror Attack
Pakistan Protest: ..पाकिस्तान पुन्हा पेटलं! काश्मीरमध्ये सरकारविरुद्ध निदर्शने; आंदोलक-पोलिसांत गोळीबार, 2 नागरिक ठार

19 दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) चे एकूण 19 दहशतवादी मारले गेले आहेत. या शोध मोहिमेमध्ये 11 सैनिक शहीद झाले. या परिसरात आणखी दहशतवादी दडून बसले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सध्या मोठे तलाशी अभियान (Search Operation) सुरु आहे.

खैबर पख्तूनख्वा सर्वाधिक प्रभावित

सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्योरिटी स्टडीज (CRSS) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत खैबर पख्तूनख्वा हा देशामधील सर्वाधिक हिंसक घटनांनी प्रभावित झालेला प्रदेश होता. या प्रांतात एकूण हिंसाचार-संबंधित मृत्यूंपैकी सुमारे 71 टक्के (638) मृत्यू झाले. तसेच, एकूण 67 टक्के (221 हून अधिक) हिंसक घटना याच भागात घडल्या. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन्ही प्रांत अफगाणिस्तानशी सीमा जोडतात, ज्यामुळे TTP या भागात अधिक सक्रिय आहे.

Pakistan Terror Attack
Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

TTP बद्दल महत्त्वाची माहिती

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी गटाची मुळे अफगाणिस्तानच्या तालिबान चळवळीशी जोडलेली असली तरी, हा गट पाकिस्तानमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत आहे. दक्षिण वझिरीस्तानचे प्रभावशाली नेते बैतुल्लाह महसूद यांनी या संघटनेची स्थापना केली होती. TTP अनेक लहान गटांचे गठजोड आहे. 2020 नंतर TTP ने अनेक विखुरलेल्या गटांना पुन्हा एकत्र केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये, विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानसारख्या सीमावर्ती भागांमध्ये त्यांच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com