Worlds Oldest Man: जगातील सर्वात वृद्ध मानल्या जाणार्या जोस पॉलिनो गोम्स यांचे निधन झाले. स्थानिक ब्राझिलियन मीडियानुसार, गोम्स 127 वर्षांचे होते. विशेष म्हणजे, चार दिवसांनंतर त्यांचा 128 वा वाढदिवस होता.
मिनास गेराइस राज्यातील पेड्रा बोनिटा येथील त्यांच्या राहत्या शुक्रवारी निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, गोम्स इतके फिट होते की चार वर्षांपूर्वीही ते हॉर्स राइडिंग करताना दिसले होते.
दरम्यान, त्यांचे विवाह प्रमाणपत्र पेड्रा बोनिटाच्या रजिस्ट्री ऑफिसमधून प्राप्त झाले आहे. 1917 च्या विवाह प्रमाणपत्रानुसार, जोस यांचा जन्म 4 ऑगस्ट 1895 रोजी झाला होता.
जर त्यांच्या वयाबद्दलचा दावा बरोबर असेल तर त्याचा अर्थ असा होईल की, गोम्स यांचा जन्म राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूपूर्वी झाला होता.
अशा प्रकारे त्यांनी दोन्ही महायुद्धे पाहिली असतील. नोंदीनुसार, वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचे लग्न (Marriage) झाले होते. त्यांचा जन्म 1900 पूर्वी झाला असे मानले जाते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सध्याचा रेकॉर्ड धारक स्पेनमधील मारिया ब्रान्यास मोरेरा आहे, ज्याचे वय 115 वर्षे आहे.
गोम्स यांच्या वयाची नोंद मात्र मागील विक्रमाशी विरोधाभास दर्शवते, ज्यात असे नमूद केले आहे की सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती फ्रेंच महिला जीन कॅलमेंट होती, ज्यांचे वयाच्या 122 व्या वर्षी 1997 मध्ये निधन झाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे त्यांचे वय विचारात घेतले जाईल की, नाही हे स्पष्ट नाही.
दुसरीकडे, जोस यांची नात एलियान फरेरा यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, येथे ग्रामीण भागात लोक मोठे झाल्यावर त्यांची नोंदणी केली जाते.
चुकीच्या दस्तऐवजाची अनेक प्रकरणे आहेत, परंतु त्यांच्या दस्तऐवजावरुन असे दिसून येते की त्यांचा जन्म खूप पूर्वी झाला होता.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 98 वर्षीय महिलेने (Women) सांगितले की, मी त्यांना लहानपणापासून ओळखत होते. त्याचवेळी, त्यांचे वय जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. निश्चितपणे त्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असेल. गोम्स वन्य प्राण्यांना प्रशिक्षण देत असे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.