Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomamntak

PAK ड्रॅगनला विकणार गिलगिट-बाल्टिस्तान; घेणार मोठं कर्ज

दिवसेंदिवस श्रीलंका आणि पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत आहे.
Published on

भारताचे (India) शेजारील देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यात देखील श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. अनेक देशांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (pakistan to sell Gilgit Baltistan to china)

Shehbaz Sharif
Israel: यायर लाफेड फक्त पाच महिन्यांसाठी बनले इस्रायलचे नवे पंतप्रधान; घ्या जाणून कारण

आणि यानंतरही पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन कर्ज घेत आहे. माध्यमांनूसार पाकिस्तान आता आपला मित्र चीनकडून 19 हजार कोटी रुपयांचे नवीन कर्ज घेणार असल्याचे समोर आले आहे. त्या बदल्यात गिलगिट आणि बाल्टिस्तानचा भाग चीनच्या ताब्यात द्यावा लागेल असेही सांगण्यात येत आले. आपली ढासळलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे असे म्हणायला हरकत नाही.

पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून देखील पाकिस्तानला 90 हजार कोटी रुपये मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आता पाकिस्तान आपली सरकारी मालमत्ता आणि क्षेत्र गहाण ठेवणार आहे. अहवालानुसार, पाकिस्तान आपल्या व्याप्त काश्मीर (पीओके) चा भाग चीनच्या ताब्यात देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shehbaz Sharif
Udaipur Murder Case: उदयपूर हत्याकांडावर UN चे मोठे वक्तव्य, बोलली ही मोठी गोष्ट

पाकने सरकारी कंपन्यांचे शेअर्स UAE ला विकले.

चीन व्यतिरिक्त पाकिस्तानने UAE (संयुक्त अरब अमिराती) कडूनही मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. आता आणखी 8 हजार कोटींचे कर्ज पाकिस्तान घेणार असल्याचे समोर आले आहे. यासाठी ते 20 सरकारी कंपन्यांचे 12% पेक्षा जास्त शेअर UAE च्या ताब्यात देणार आहेत. पाकिस्तानने 2018 पासून सौदी अरेबियाकडून 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता तर फेब्रुवारीमध्येच सौदी अरेबियाने पाकिस्तानला 10 हजार कोटींचे कर्ज देखील दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com