पाकिस्तानात (Pakistan) हिंदूंवरचे अन्याय काही केल्या थांबत नाही आहेत. आज काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या वायव्य शहर पेशावरमध्ये (Peshawar) एका शीख हकीमची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे . पोलिसांनी सांगितले की, हकीम सरदार सतनाम सिंग (Hakeem Sardar Satnam Singh) यांची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बंदुकधाऱ्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला आणि चार गोळ्या झाडल्यानंतर सिंगचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले आहेत.(Pakistan Sikh medicine practitioner Hakeem Sardar Satnam Singh dead in firing in Peshawar)
हकीम सरदार सतनाम सिंग पेशावरच्या चारसद्दा रोडवर क्लिनिक चालवत असत. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराला वेढा घातला जेणेकरून आरोपीला पकडता येईल. मात्र, हकीमची हत्या कोणत्या कारणांमुळे झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर हकीम सतनाम सिंगच्या हत्येनंतर पोलीस वेगवेगळ्या मार्गाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये दहशतवादाची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सतत पाकिस्तनातील हिंदू आणि शीख अल्पसंख्यांक समुदायाच्या संरक्षणाबद्दल बोलत असतात . पण त्यांच्या देशात घडणाऱ्या घटना त्याच्या विधानांपासून पूर्णपणे उलट आहेत. येथे हिंदू आणि शीख कुटुंबांना दररोज कट्टरवादि लक्ष करत असतात. यामुळे इम्रानवर जगभरातून टीकाही झाली आहे. 2017 च्या जनगणनेनुसार हिंदू हे पाकिस्तानातील सर्वात मोठे धार्मिक अल्पसंख्याक आहेत. ख्रिश्चन समाज हा दुसरा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक आहे. त्याच वेळी, अहमदी, शीख आणि पारशी हे पाकिस्तानातील उल्लेखनीय धार्मिक अल्पसंख्याक आहेत.
यापूर्वी, जिल्हा प्रशासनाने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कराक जिल्ह्यातील एका हिंदू मंदिराच्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. मंदिराच्या अंगणात एक भिंतही बांधण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.