'पख्तूनांना तालिबान बद्दल सहानभूती'; इम्रान खान यांचं धक्कदायक विधान

UNGA मध्ये भाषण करताना इम्रान खान (Imran Khan) म्हणाले होते की अस्थिर आणि अराजक असलेला अफगाणिस्तान पुन्हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून उदयास येईल.
Imran Khan: 'Pakhtuns sympathize with Taliban'
Imran Khan: 'Pakhtuns sympathize with Taliban' Dainik Gomantak

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (UNGA) आपल्या भाषणात पख्तूनांना (Khyber Pakhtunkhwa) तालिबान (Taliban) बद्दल सहानभूती असल्याचे म्हण्टले होते. आता त्यांच्या या विधानाने विरोधक आक्रमक होत त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. डॅनच्या अहवालानुसार अवामी नॅशनल पार्टीचे केंद्रीय सरचिटणीस मियां इफ्तिखार हुसेन (Iftikhar Hussain Khan Mamdot) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हुसैन म्हणाले, पंतप्रधानांनी पश्तूननांना तालिबानशी सहानुभूती असल्याचे सांगून इतिहासाचा विपर्यास केला आहे.(Imran Khan: 'Pakhtuns sympathize with Taliban')

डॉनच्या अहवालानुसार, स्वतःला पख्तून म्हणवणाऱ्या हुसेनने असेही सांगितले की दहशतवादाविरोधातील युद्धात सुमारे 80,000 लोकांनी आपले प्राण गमावले होते आणि त्यापैकी बहुतेक पश्तूनच होते, ज्यात पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलच्या 144 विद्यार्थ्यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या महासभेला एका भाषणात इम्रान खान म्हणाले होते, "अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील अर्ध-स्वायत्त आदिवासी भागात राहणाऱ्या पश्तूननांना नेहमीच तालिबानबद्दल आत्मीयता आणि सहानुभूती आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अवामी नॅशनल पार्टी संतापली आहे .

UNGA मध्ये भाषण करताना इम्रान खान म्हणाले होते की अस्थिर आणि अराजक असलेला अफगाणिस्तान पुन्हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून उदयास येईल. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने युद्धग्रस्त देशात सध्याच्या सरकारला बळकट आणि स्थिर केले पाहिजे.संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी देशासाठी मानवतावादी मदतीची विनंती करताना म्हटले की, "जर आपण अजूनही अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त राष्ट्रांच्या मते अफगाणिस्तानचे निम्मे लोक आधीच असुरक्षित आहेत आणि पुढच्या वर्षी 90 % पर्यंत अफगाणिस्तानचे लोक दारिद्र्य रेषेखाली जातील."

Imran Khan: 'Pakhtuns sympathize with Taliban'
पाकिस्तानी अधिकाऱ्याची नेपाळ लष्करप्रमुखांशी भेट, भारताला सूचक इशारा

या दरम्यान, इम्रान खान म्हणाले की, अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीसाठी अमेरिका आणि युरोपमधील काही राजकारण्यांकडून पाकिस्तानला दोषी ठरवले जात आहे, अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानवर व्यापक टीकेचा संदर्भ दिला. या मंचावरून मी सर्वांना सांगू इच्छितो की अफगाणिस्तान व्यतिरिक्त ज्या देशाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला तो पाकिस्तान आहे. तसेच 9/11 नंतर अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात आम्ही देखील सामील झालो होतो .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com