Bilawal Bhutto: हाफिज सईद अन् मसूद अझहरला भारताकडे सोपवण्यास पाकिस्तान तयार? का बदलला बिलावल भुट्टोंचा सूर? वाचा

Bilawal Bhutto Statement: बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहर या दोघांना भारताकडे सोपवण्यास तयार आहे.
Bilawal Bhutto Statement
Bilawal BhuttoDainik Gomantak
Published on
Updated on

Hafiz Saeed and Masood Azhar extradition: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या तणावपूर्ण आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकड्यांची चांगलीच खोड मोडली. भारताने ऑपरेशनबरोबर काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू नदी जलवाटप करार स्थगित करणे होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकवण्यास भाग पाडले.

याचदरम्यान आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एक वक्तव्य करुन सर्वांनाच चकित केले आहे. बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहर या दोघांना भारताकडे सोपवण्यास तयार आहे. बिलावल भुट्टो यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? त्यांनी अचानक सूर का बदलला? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

Bilawal Bhutto Statement
Pakistan: पाकड्यांची मस्ती कायम...! मुनीर यांनी पुन्हा ओकली गरळ; दहशतवादी कारवायांना "कायदेशीर संघर्ष" म्हणत दिला पाठिंबा

बिलावल भुट्टो काय म्हणाले?

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांना संभाव्य करार आणि सद्भावना कार्यक्रमाचा भाग म्हणून भारताकडे सोपवले जाईल का?

यावर बिलावल म्हणाले, "व्यापक चर्चेचा भाग म्हणून जिथे दहशतवाद हा आम्ही चर्चा करत असलेल्या मुद्द्यांपैकी एक आहे, मला खात्री आहे की पाकिस्तान यापैकी कोणत्याही गोष्टींना विरोध करणार नाही. जर भारत या प्रक्रियेत सहकार्य करण्यास तयार असेल, तर मला खात्री आहे की चौकशी सुरु असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्यात कोणताही अडथळा येणार नाही."

बिलावलचा सूर का बदलला?

काही दिवसांपूर्वीपर्यंत बिलावल भुट्टो भारताला (India) युद्धाची धमकी देत ​​होते. ते म्हणाले होते की, जर सिंधू नदीचे पाणी थांबवले तर रक्तपात होईल. अशा परिस्थितीत त्यांच्या अचानक बदललेल्या सूरामागे ही 5 प्रमुख कारणे असू शकतात.

Bilawal Bhutto Statement
India Pakistan Tensions: 'भारताच्या हवाई संरक्षणाबाबत चीनने पुरवली गुप्तचर माहिती...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा खळबळजनक खुलासा

ऑपरेशन सिंदूरचा दबाव

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला संदेश दिला की, भारत पाकिस्तानमध्ये कुठेही हल्ला करु शकतो. लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानने भारतावर केलेले सर्व हल्ले निष्फळ ठरले, परंतु भारताने पाकिस्तानमध्ये खूप विनाश घडवून आणला. याशिवाय, भारताने असेही म्हटले की, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानवर खूप दबाव आहे.

आंतरराष्ट्रीय दबाव आणि FATF

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर खूप आंतरराष्ट्रीय दबाव आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादाचा आश्रयस्थान म्हणून चेहरा उघड झाला आहे. त्याचवेळी, पाकिस्तानला भीती आहे की, तो FATF च्या ब्लक लिस्टमध्ये पुन्हा एकदा जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल.

Bilawal Bhutto Statement
Pakistan Inflation: भारताशी पंगा घेणं पाकड्यांना पडलं महागात; कर्जबाजारी पाकिस्तानात उडाला महागाईचा भडका

भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न

भारताने पाकिस्तानशी व्यापार बऱ्याच काळापासून थांबवला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली असून अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताशी संबंध सुधारु इच्छित आहे, जेणेकरून अर्थव्यवस्था आणि व्यापाराला फायदा होईल.

जल संकटाची भीती

भारत सरकारने सिंधू पाणी करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तानला जल संकटाची भीती वाटत आहे. पाकिस्तानची संपूर्ण शेती सिंधू नदी करारांतर्गत मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणी थांबवले तर पाकिस्तान उद्ध्वस्त होऊ शकतो. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताशी वाटाघाटी करण्याचे मार्ग शोधत आहे.

Bilawal Bhutto Statement
Pakistan High Commission: आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारताने हाकलले; 24 तासांत देश सोडण्याचा दिला आदेश

अंतर्गत राजकीय रणनीती

बिलावल भुट्टो यांच्या आई बेनझीर भुट्टो देखील पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. तथापि, पाकिस्तानच्या राजकारणात बिलावल अद्याप त्या पातळीपर्यंत पोहोचले नाहीत. अशा परिस्थितीत बिलावल भुट्टो अशा वक्तव्याद्वारे स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला पाकिस्तान पीपल्स पार्टीला मुख्य प्रवाहात परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com