युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांच्यासोबत करणार चर्चा

''जर पुतिन चर्चेसाठी तयार असतील तर युद्ध संपवण्यासाठी युक्रेनही तयार''
Ukraine Russia war
Ukraine Russia warDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला सुमारे तीन महिने झाले आहेत. मात्र अद्याप या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरुच आहे. जगाला अर्थिक संकटाच्या गर्तेत ढकलण्यास कारणीभूत ठरलेल्या या युक्रेन आणि रशिया युद्धाने संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे. याचे परिणाम युक्रेन आणि रशिया यांना ही भोगावे लागले आहेत. त्यामूळे आता दोन्ही राष्ट्रे एक - एक पाऊल मागे घेत चर्चा करण्यास तयार आहेत. (Ukraine's president to hold direct talks with Putin )

Ukraine Russia war
अफगाण महिलांवरील निर्बंध मागे घेण्याचे UN चे आवाहन तालिबानने फेटाळले

आता जगभरातील देशांकडून हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युद्ध संपवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, जर पुतिन चर्चेसाठी तयार असतील तर युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास युक्रेनही तयार आहे. युद्ध संपावे अशी सर्वांची इच्छा आहे. झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, रशियाकडून युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरुच असताना रशियासोबत चर्चा करण्याची इच्छा नाही. पण युक्रेनमधील नागरिकांना सामान्यपणे जीवन जगता येण्यासाठी चर्चा हाच एक मार्ग आहे. युद्ध संपावं अशीच सर्वांची इच्छा आहे. झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासोबत बैठक करण्याची तयारी दर्शवली आहे.

झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, ही बैठक आपला देश टिकण्यासाठी आणि युद्ध संपण्यासाठी गरजेची आहे. यामुळे युक्रेनचे नागरिक देशात परंतू शकतील. तसेच यामुळे जगात शांतता टिकून राहील. या आधी झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, आता ते फक्त थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीच चर्चा करणार आहेत आणि इतर कोणाच्याही माध्यमातून चर्चेस तयार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com