Terrorist Hafiz Saeed: हाफिज सईदवर कधी कारवाई होणार? पत्रकाराच्या जळजळीत प्रश्नावर पाकिस्तानी PMची लाजिरवाणी पळापळ; भारताचा सज्जड दम ठरला खरा VIDEO

Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism: दहशतवादाच्या मुद्द्यावरुन जगात पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश झाला.
Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism
Terrorist Hafiz SaeedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism: दहशतवादाच्या मुद्द्यावरुन जगात पुन्हा एकदा पाकड्यांचा पर्दाफाश झाला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्क येथे पोहोचलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एका पत्रकारने लश्कर-ए-तैय्यबाचा कुख्यात प्रमुख हाफिज सईद याच्यावर कधी कारवाई करणार, असा थेट प्रश्न केला. मात्र, या प्रश्नावर कोणतही उत्तर न देता शरीफ यांनी तेथून पळ काढला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला.

ही संपूर्ण घटना तेव्हा घडली जेव्हा पाकिस्तानी पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात दाखल होत होते. त्यावेळी 'ANI'च्या पत्रकाराने त्यांना अडवून, "पंतप्रधानजी, तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देणे कधी बंद करणार?" असा प्रश्न विचारला. त्यानंतर, जेव्हा ते UN मुख्यालयातून बाहेर पडत होते, तेव्हा पत्रकारने पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत विचारले, "तुम्ही लश्कर-ए-तैय्यबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर कायदेशीर खटला कधी चालवणार?" परंतु, या दोन्ही प्रश्नांवर मौन बाळगणेच पाकिस्तानी पंतप्रधानांनी पसंत केले आणि उत्तर न देता ते तिथून निघून गेले.

Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism
Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

विशेष म्हणजे, याआधी शांघाय सहयोग संघटनेच्या शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला (Pakistan) खडे बोल सुनावले होते. पाकिस्तानला दहशतवादाचा नायनाट करावाच लागेल, असा सज्जड दम भारताने दिला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरुद्ध कितीही बढाया मारल्या आणि शांततेचे दावे केले, तरी प्रत्यक्षात दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी पाकिस्तानची जुनी प्रवृत्ती या घटनेमुळे पुन्हा एकदा जगासमोर उघडी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com