इम्रान खान यांनी हुर्रियत नेते गिलानींना ठरवले 'पाकिस्तानी'!

पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी येथे गिलानी यांना 'पाकिस्तानी' म्हणत देशाचा झेंडा अर्धवट झुकवला.
Syed Ali Geelani
Syed Ali GeelaniDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरमधील (Jammu-Kashmir) फुटीरतावादी हुर्रियत नेते (Separatist Movement) सय्यद अली शाह गिलानी (Syed Ali Geelani) यांच्या निधनानंतरही पाकिस्तानच्या (Pakistan) खुरापती कमी होण्याचं काही दिसत नाहीत. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी गिलानी यांना 'पाकिस्तानी' म्हणत देशाचा झेंडा अर्धवट झुकवला. इम्रान यांनी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. गिलानी यांचे बुधवारी रात्री श्रीनगरमध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. सय्यद अली शाह गिलानी दीर्घकाळापासून आजारी होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले की, 'काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी आणि त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी लढा दिला. भारताने त्यांना तुरुंगात ठेवले आणि यातना दिल्या. इम्रान पुढे म्हणाले,' आम्ही पाकिस्तानमधील त्यांच्या लढ्याला सलाम करतो. आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे. पाकिस्तानचा ध्वज त्यांच्या निधनानंतर अर्धवट राहील आणि आम्ही अधिकृत शोक दिवसही पाळत आहोत.

Syed Ali Geelani
तालिबान सरकारची उद्या घोषणा, कोण होणार पंतप्रधान ?

बाजवा यांनी भारतावर आरोप केले

गिलानी यांच्या निधनावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Kamar Javed Bajwa) म्हणाले की, गिलानी यांच्या निधनाने आम्हाला खूप दु: ख झाले आहे. ते काश्मीरमधील स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. बाजवा यांनी भारतावर आरोपही केले. त्याचवेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Foreign Minister Shah Mahmood Qureshi) यांनी गिलानी यांचे काश्मिरी चळवळीचे प्रणेते म्हणून वर्णन केले. कुरेशी म्हणाले की, अटकेनंतरही ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.

Syed Ali Geelani
तालिबान ने ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तान’ ची केली घोषणा

गिलानी यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान मिळाला

भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जात असलेले गिलानी यांना पाकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मानही दिला. काश्मीरमधील गिलानी यांच्या प्रभावाचा अंदाज यावरुन घेता येतो की, त्यांच्या एका आवाजावर काश्मीर बंद होत असे. तथापि, असे काही प्रसंग आहेत जेव्हा काश्मिरी लोकांनी गिलानींवर एक प्रकारे बहिष्कार टाकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com