तालिबान ने ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तान’ ची केली घोषणा

संघटनेने ब्रिटिश राजवटीपासून अफगाणिस्तान स्वातंत्र्याच्या 102 व्या वर्धापन दिनानिमित्त इस्लामिक अमिरात स्थापन (Islamic Emirate of Afghanistan) करण्याचा निर्णय घेतला आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

अशरफ घनी सरकारला (Ashraf Ghani Government) हटवल्यानंतर चार दिवसांतच तालिबानने (Taliban) गुरुवारी अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इस्लामिक अमिरातच्या (Islamic Emirate of Afghanistan) निर्मितीची घोषणा केली. अतिरेकी गटाचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Jabiullah Mujahid) यांनी एका ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले की, संघटनेने ब्रिटिश राजवटीपासून अफगाणिस्तान स्वातंत्र्याच्या 102 व्या वर्धापन दिनानिमित्त इस्लामिक अमिरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, इस्लामिक अमीरातला सर्व देशांशी चांगले राजनैतिक आणि व्यापार संबंध हवे आहेत. आम्ही कोणत्याही देशाशी व्यापार नाकारलेला नाही.

तालिबानच्या एका वरिष्ठ सदस्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, अफगाणिस्तानवर आता सत्ताधारी परिषदेचे राज्य असेल. त्याचबरोबर तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतहुल्ला अखुंदजादा (Haibatahulla Akhundzada) प्रभारी असेल. तालिबानला एकत्रित आणणाऱ्या वाहिदुल्ला हाशिमीने सांगितले की, तालिबान आपल्या गटांमध्ये सामील करण्यासाठी अफगाण सैन्यातील पूर्व पायलट आणि सैनिकांचा समावेश करुन घेणार आहे. त्याचबरोबर इस्लामी कायद्यानुसार देशावर राज्य करण्यात येणार आहे.

Taliban
Afghan स्वातंत्र्य दिनीच तालिबान्यांनी नागरिकांवर केला अमानुष गोळीबार

या चार लोकांपैकी कोणीही अफगाणिस्तानचा 'राष्ट्रपती' बनेल!

तालिबानच्या सर्वोच्च नेत्यासंह तीन नायब प्रमुख आहेत. यामध्ये मुल्ला उमरचा मुलगा मावलवी याकूब, शक्तिशाली हक्कानी नेटवर्कचा नेता सिराजुद्दीन हक्कानी, दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्दुल गनी बरदार आणि तालिबानचा संस्थापकाचा समावेश आहे. हाशिमी यांनी स्पष्ट केले की, तालिबान अफगाणिस्तानवर राज्य कसे चालवतील याबद्दल अंतिम रुप देणे बाकी आहे. अफगाणिस्तानात यापुढे लोकशाही असणार नाही. कोणतीही लोकशाही व्यवस्था असणार नाही कारण आपल्या देशाला कोणताही आधार नाही, असे ते म्हणाले.

Taliban
Afghanistan: तालिबान्यांनी कंधार विमातळावर डागले रॉकेट

अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू होईल!

वाहिदुल्ला हाशिमी म्हणाले, आम्ही अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था लागू करावी यावर चर्चा करणार नाही कारण ती पूर्णपणे स्पष्ट आहे. हा शरिया कायदा आहे आणि तो देशात लागू होईल. हाशिमी म्हणाले की, ते या आठवड्याच्या अखेरीस तालिबान नेतृत्वाच्या बैठकीत उपस्थित राहतील, जेणेकरून प्रशासनाच्या मुद्यांवर चर्चा होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काबूल विमानतळाद्वारे मोठ्या संख्येने लोक देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे कारण म्हणजे तालिबान ग्राउंड बॉर्डर क्रॉसिंगवर नियंत्रण ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com