घटस्फोटाच्या दिवशीच पाकिस्तानातील खासदाराने 18 वर्षीय तरुणीशी बांधली लग्नगाठ

पाकिस्तानमधील (Pakistan) लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ आमिर लियाकत हुसैन (Dr Aamir Liaquat Hussain) यांनी 18 वर्षीय मुलीसोबत तिसरे लग्न केले आहे.
Dr Aamir Liaquat Hussain
Dr Aamir Liaquat HussainDainik Gomantak
Published on
Updated on

इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे पीटीआय खासदार आणि पाकिस्तानमधील (Pakistan) लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ. आमिर लियाकत हुसैन (Dr Aamir Liaquat Hussain) यांनी 18 वर्षीय मुलीसोबत तिसरे लग्न केले आहे. 49 वर्षीय हुसैन यांनी बुधवारी 18 वर्षीय सय्यदा दानिया शाहसोबत (Syeda Dania Shah) लग्न केले. इम्रान यांच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या या लग्नाची शेजारील देशात जोरदार चर्चा आहे. इथे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्या दिवशी लग्न झाले, त्याच दिवशी पाकिस्तानी खासदाराने आपल्या दुसऱ्या पत्नीलाही घटस्फोट दिला होता. (Dr Aamir Liaquat Hussain Has Tied The Knot With An 18 Year Old Girl)

दरम्यान, डॉ. अमीर लियाकत हुसैन यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या नव्या पत्नीबद्दल लिहिले, 'काल रात्री 18 वर्षांच्या सईदा दानिया शाहचे (Saida Dania Shah) लग्न झाले.' त्यांच्या पोस्टमध्ये पाकिस्तानचे (Pakistan) खासदार त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे तोंडभरुन कौतुक केले. ते पुढे म्हणाले, 'सईदा सुंदर, सुशील, साधी आणि प्रिय आहे. मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासाठी भावी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. आयुष्यातील वाईट काळ मी मागे सोडला आहे. तो चुकीचा निर्णय होता.

Dr Aamir Liaquat Hussain
हिजाबच्या वादात तालिबानची एन्ट्री, निषेध करणाऱ्या मुलींना दिला पाठिंबा

काय म्हणाली अमीर लियाकत हुसैनची दुसरी पत्नी?

अनेक महिन्यांच्या अटकळेनंतर, इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाच्या खासदाराची दुसरी पत्नी अभिनेत्री तुबा अमीरने बुधवारी पुष्टी केली की, आपण हुसेन यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मी तसा अर्जही दाखल केला होता. सोशल मिडियावरील (Social Media) इंस्टाग्रामवर पोस्ट करत तुबाने खुलासा केला की, आम्ही दोघे 14 महिन्यांपूर्वी वेगळे झालो होतो. नात्याची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कोणतीही आशा नसल्याचे कारण देत तुबा म्हणाली, मी न्यायालयात घटस्फोट घेण्याचा पर्याय निवडला.

तुबा आमिरने इंस्टाग्रामवर लिहिले की, ''खूप जड अंतःकरणाने मला माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व घडामोडी सांगायच्या आहेत. माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे की 14 महिन्यांपूर्वी आम्ही दोघे वेगळे झाल्यानंतर हे स्पष्ट झाले की, आमच्यामध्ये समेट होण्याची कोणतीही आशा नव्हती. त्यामुळेच मी न्यायालयात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.’ तिने पुढे निवेदनात म्हटले की, ‘हे किती कठीण होते ते मी सांगू शकत नाही, परंतु माझा अल्लाह विश्वास आहे. या कठीण काळात मी प्रत्येकाला माझ्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन करेन.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com