Pakistan: नवाझ शरीफ यांचा 'वनवास' संपला, चार वर्षांनंतर पाकिस्तानात परतले, इम्रान खानचे भाकीत खरे ठरले!

मिनार-ए-पाकिस्तान येथे संध्याकाळी 05 वाजता नवाझ शरीफ जाहीर सभेला संबोधित करतील.
Nawaz Sharif
Nawaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चार वर्षानंतर मायदेशात परतले आहेत. चार वर्षे परदेशात राहिल्यानंतर शरीफ शनिवारी दुपारी इस्लामाबादला पोहोचले. नवाझ शरीफ इस्लामाबादला परतले तेव्हा माजी कायदा मंत्री आझम तरार आणि पीएमएल-एनचे अनेक बडे नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. नवाझ शरीफ आजच इस्लामाबादहून लाहोरला जाणार आहेत.

मिनार-ए-पाकिस्तान येथे संध्याकाळी 05 वाजता नवाझ शरीफ जाहीर सभेला संबोधित करतील. नवाझ शरीफ यांना 2018 मध्ये निवडणूक लढवण्यास न्यायालयाने अपात्र ठरवले होते. 2019 मध्ये न्यायालयाने त्याला जेलमधूनच उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. यानंतर अटकेच्या भीतीने शरीफ पाकिस्तानच्या बाहेर होते. न्यायालयाकडून अटकेतून दिलासा मिळाल्यानंतर ते परतले आहेत.

पाकिस्तानला जाण्यापूर्वी शरीफ यांनी दुबई विमानतळावर पत्रकारांना त्यांच्या भविष्याबद्दल विचारले त्यावर, अल्लाहवर सर्वस्व सोडून पाकिस्तानला जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, शरीफ यांनी पाकिस्तानातील सद्यस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली.

Nawaz Sharif
National Games Goa 2023: महाराष्ट्राचा दुसरा पराभव, कर्नाटकला पुरुष सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्ण

देशातील परिस्थिती 2017 च्या तुलनेत खूपच खालावली आहे. हे सर्व पाहून मला वाईट वाटते की आपला देश पुढे जाण्याऐवजी मागे गेला आहे. पाकिस्तानमध्ये लोक विविध समस्यांना तोंड देत आहेत. हे पाहणे वेदनादायक आहे परंतु आशा आहे की आम्ही परिस्थिती सुधारू शकू.

नवाझ शरीफ पाकिस्तानात परतताच इम्रान खान यांचे एक जुने वक्तव्यही समोर आले आहे. इम्रानच्या पक्ष पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये इम्रान खान नवाझ शरीफ परत येतील पण त्याआधी त्यांना त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे थांबवायची आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने राहावे आणि कोणीही आपल्यासमोर ठामपणे उभे राहणार नाही तेव्हाच निवडणुका घ्याव्यात. असे ते या म्हणताना दिसत आहेत.

नवाझ शरीफ हे पाकिस्तानातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबाची पाकिस्तानच्या राजकारणावर चांगली पकड आहे. नवाझ शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ हे दोघेही पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत.

दोन्ही भाऊ पंजाब राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. 1976 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षात प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केली. नवाझ शरीफ यांची 1990 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. यानंतर 1997 मध्ये नवाझ शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. 2013 मध्ये ते तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com