Pakistan Economic Crisis: पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करु नका, पाक मंत्र्याने पुरवठादारांना भरला दम!

Petrol Diesel Shortage In Pakistan: आर्थिक संकटाने घेरलेल्या पाकिस्तानसमोर आता पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवणे मोठे आव्हान आहे.
Petrol-Diesel
Petrol-Diesel Dainik Gomantak
Published on
Updated on

Petrol Diesel Shortage In Pakistan: आर्थिक संकटाने घेरलेल्या पाकिस्तानसमोर आता पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे.

हे पाहता पेट्रोलियम राज्यमंत्री मुस्सादिक मलिक यांनी बुधवारी देशातील पेट्रोलियम पुरवठादारांना कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण करु नये, असा इशारा दिला आहे.

मलिक म्हणाले की, 'पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल.' पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुढील 20 दिवस पेट्रोल आणि 29 दिवस डिझेल उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Petrol-Diesel
Pakistan Economic Crisis: तोंड बोलतं अन्...! पाक PM च्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुस्सादिक मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "काही लोकांना नेहमी साठेबाजी करायला आवडते... मात्र तुम्ही लोकांच्या हक्कावर गदा आणू शकत नाही... हा आमचा संकल्प आहे. मात्र, तुम्ही हे करत राहिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्ही तुमचा परवाना रद्द करु.'

'काही फिलिंग स्टेशन मालक सहभागी होते'

भविष्यात जास्त किमतीत इंधन विकण्याच्या उद्देशाने फिलिंग स्टेशनचे काही मालक साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात गुंतले होते, असे मलिक म्हणाले. अशा लोकांवर सरकार (Government) कठोर कारवाई करेल. राज्याच्या आदेशाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Petrol-Diesel
Pakistan Economic Crisis: जिन्नांच्या पाकिस्तानला IMF कडून 'जोर का झटका', देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

किंमतींमध्ये कोणतीही सुधारणा नियोजित नाही

मलिक पुढे म्हणाले की, 'पेट्रोलियमच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही.' रशियासोबतच्या करारानंतर कमी किमतीचे कच्चे तेल इथे येऊ लागेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com