Iran-USA: 'जर इस्राइलला पाठिंबा देणं थांबवलं नाही तर...' संतप्त इराणचा अमेरिकेला इशारा

Iran-USA: इस्रायल-हमास युद्धादरम्यान हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे तेहरान नव्हे तर वॉशिंग्टन असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
Iran-USA
Iran-USADainik Gomantak

Iran-USA: गेल्या काही दिवसांपासून इस्राइल-हमासमध्ये संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे. आता या संघर्षात इतर देशही सामील होताना दिसत आहे. हमासने इस्राइलवर अॅटॅक केल्यानंतर अनेक देशांनी इस्राइलला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, आता अमेरिका इतर देशांना मदत शांततेचे आव्हान करत आहे मात्र अमेरिकेने स्वत: इस्राइलला पूर्णपणे पाठींबा दर्शवला आहे. यामुळे अशांततेत वाढ होत असून अमेरिका हेच धोरण ठेवत असेल तर अमेरिकेविरुद्ध इतर आघाड्यादेखील उघडतील असा इशारा इराणने दिला आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराब्दोल्लाहियान याबद्दल वक्तव्य केले आहे. इराणने अलीकडील दिवसांत सीरिया आणि इराकमधील गटांना अमेरिकन सैन्याला लक्ष्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या या आरोपांचे खंडन केले त्यांनी केले असून त्यांच्यामध्ये इस्रायल-हमास युद्धादरम्यान हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे तेहरान नव्हे तर वॉशिंग्टन असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'मला फक्त इशारा द्यायचा आहे की जर गाझामध्ये महिला आणि मुले मारली जात राहिली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे अमेरिकेने ठरवावे की त्याला खरोखर युद्ध वाढवायचे आहे का?

Iran-USA
Yogesh Kadyan: निरागस चेहऱ्याच्या गॅंगस्टर योगेश कादियान विरोधात रेड कॉर्नर

अमेरिकेचा इराणवर आरोप

अमेरिकेने नुकतेच म्हटले होते की त्यांनी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित दोन सीरियातील प्रतिष्ठानांवर लष्करी हल्ले केले होते, ज्यांचा वापर या भागातील अमेरिकन सैन्यावर हल्ले करण्यासाठी केला जात होता.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्ध सुरू असून त्यात साडेसात हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता हा संघर्ष कधी संपणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com