पाकिस्तानच्या (Pakistan) शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या इस्लामाबादच्या (Islamabad) दिशेने निघालेल्या 'लाँग मार्च'वर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत इम्रान खान यांना राज्याच्या रिटला आव्हान देऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Imran Khan's Long March)
पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांच्या पोलिसांनी इम्रान खानच्या 'लाँग मार्च'विरोधात रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. द न्यूजने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यात आपत्कालीन परिस्थिती वगळता पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी काटेरी तारांनी वेढलेल्या संवेदनशील ठिकाणांना भेट दिली.
सरकार निमलष्करी दलाला पाचारण करणार!
सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सरकार मात्र जमावाला इस्लामाबादमध्ये शांततेने प्रवेश करण्यास आणि धरणे आंदोलन करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी कलम 245 अंतर्गत सैन्य किंवा निमलष्करी दलांना पाचारण करणे हा सरकारचा विशेषाधिकार आहे. आंदोलकांशी कसे वागावे याबाबत सरकारने अद्याप कोणताही आदेश काढलेला नाही, मात्र 'लाँग मार्च'साठी पोलिस पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.