पाकची वाटचाल लंकेच्या दिशेने, पेट्रोलचा दर 209 रुपये प्रति लिटरवर

पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ, महागाईने त्रस्त नागरिकांची चिंता वाढली
Fuel Price in Pakistan
Fuel Price in PakistanDainik Gomantak

आता श्रीलंकेसारखी व्यथा पाकिस्तानची होणार असे चिन्ह दिसत आहेत. तुम्ही विचार करत असाल असे का? खरे तर पाकिस्तानात महागाई शिगेला पोहोचली आहे आणि तेलाच्या किमती पेटल्या आहेत. श्रीलंकेत आर्थिक संकट सुरू झाले तेव्हा तेलाच्या किमतीने याच किमती गाठल्या होत्या. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 30 रुपयांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर येथे पेट्रोल 209 रुपये 86 पैसे तर डिझेल 204 रुपये 15 पैसे झाले आहे. (Fuel Price in Pakistan)

पाकिस्तानमध्ये आठवड्याभरात दुसऱ्यांदा किमती वाढवण्यात आल्या आहेत. यानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 209.86 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 204.15 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. याआधीही गुरुवारी पेट्रोलच्या दरात 30 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Fuel Price in Pakistan
काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला खडसावले

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तेलाच्या किमती वाढवण्यास मंजुरी दिली

पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तेलाच्या किमती वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ते म्हणाले की, पीएम शरीफ यांनी 3 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 30 रुपये आणि रॉकेलच्या किमतीत 26 रुपये आणि 38 पैशांनी वाढ करण्यास सांगितले आहे. केरोसीन तेलामुळे सरकारचे नुकसान होत नाही, अन्यथा पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरकारचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Fuel Price in Pakistan
अमेरिका गोळीबार आणि नरसंहार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार

रशिया पाकिस्तानला तेल देत नाही

दुसरीकडे भारत रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी करत आहे, तर रशियाने पाकिस्तानला तेल देण्यास नकार दिला आहे. यावर अर्थमंत्री म्हणाले की, मागील सरकारने रशियाशी चांगले संबंध ठेवले नाहीत, त्यामुळे देशाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. इम्रान खान यांनी रशियाला भेट दिली, मात्र रशिया आणि पाकिस्तानमध्ये तेल करार झाल्याची कुठेही बातमी नाही.म्हणून रशिया पाकिस्तानला तेल देत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com