Australia- India
Australia- IndiaDainik Gomantak

Australia: 'मंदीरावर हल्ला करणाऱ्यांना कायद्याची ताकद दाखवू' - एंथोनी अल्बानीस

Australia: धार्मिक स्थळांवर झालेला कोणताही हल्ला ऑस्ट्रेलिया सहन करणार नाही
Published on

Australia: ऑस्ट्रेलियात हिंदू मंदीरावर हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर भारताने नारीजी व्यक्त केली होती. आता या प्रकरणावर बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीस यांनी म्हटले आहे की ऑस्ट्रेलिया धार्मिक स्थळांवर झालेले हल्ले सहन करणार नाही. ज्या व्यक्तीने अथवा समुहाने मंदीरावर हल्ले केले आहेत त्यांना ऑस्ट्रेलियातील कायद्याचा सामना करावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियीतील धार्मिक स्थळांवर झालेले हल्ले हे चिंतेचे कारण असल्याचे वक्तव्य केले होते.

ऑस्ट्रेलिया आस्थांचा सन्मान करणारा देश आहे. धार्मिक स्थळांवर झालेला कोणताही हल्ला ऑस्ट्रेलिया सहन करणार नाही मग ते हिंदूचे मंदीर असो किंवा मुस्लिमांचे मज्जीद किंवा चर्च असेही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीस यांनी म्हटले आहे .

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा करताना ऑस्ट्रेलिया( Australia ), ब्रिटन ,अमेरिका यांच्या AUKUS गटाच्या झालेल्या मिटिंगबद्दलदेखील, त्यात झालेल्या चर्चेबद्दलदेखील मोदींना सांगितल्याचे एंथोनी अल्बानीस यांनी म्हटले आहे.

Australia- India
India चा आणखी एक शेजारी देश श्रीलंका अन् पाकिस्तानच्या वाटेवर!

दरम्यान, भारतदौरा संपण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना धार्मिक स्थळांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला कायद्याचा सामना करावा लागेल, त्यांना शिक्षा होईल हे देशाच्या सुरक्षा एंजन्सी सुनिश्चित करतील. मी असे आश्वासन भारता( India )चे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीस यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com