Indian Army - Poonch Terror Attack
Indian Army - Poonch Terror AttackDainik Gomantak

Poonch Terror Attack: पाकिस्तानला सतावतेय आणखी एका 'सर्जिकल स्ट्राईक'ची भीती, या अधिकाऱ्यानं केलं मोठं वक्तव्य

Poonch Terror Attack: आता पाकिस्तानातील लोक भारताच्या दुसर्‍या सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राइकबद्दल बोलत आहेत.
Published on

Poonch Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 20 एप्रिल रोजी झालेल्या पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटू लागली आहे.

अलीकडेच माजी पाकिस्तानी राजनयिक अधिकारी अब्दुल बासित यांनी सांगितले की, 'आता पाकिस्तानातील लोक भारताच्या दुसर्‍या सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकबद्दल बोलत आहेत.

मला असे काही होईल असे वाटत नाही, कारण या वर्षी भारत SCO बैठक आणि G20 चे अध्यक्ष आहे. पण पुढील वर्षी (2024 लोकसभा निवडणुका) निवडणुकांदरम्यान भारत हे पुन्हा करु शकतो. भारतातील निवडणुकांपूर्वी हे होऊ शकते.'

अब्दुल बासित यांनी पुन्हा एकदा भीती व्यक्त केली

यावेळी, अब्दुल बासित यांनी पुन्हा एकदा भीती व्यक्त केली आहे. पूंछमध्ये भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्याची त्यांनी वकिली करुन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, 'हे कोणी केले, मग ते मुजाहिदीन असो किंवा कोणीही, त्यांनी नागरिकांना (Citizens) नाही तर लष्कराला लक्ष्य केले.'

Indian Army - Poonch Terror Attack
Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पूंछ हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले

पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. 20 एप्रिल रोजी अज्ञात दहशतवाद्यांनी (Terrorists) राजौरी सेक्टर आणि पूंछमधील भिंबर गली येथून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले आणि पाच जवान शहीद झाले. सर्व जवान राष्ट्रीय रायफल्सचे होते. ते इफ्तार पार्टीसाठी फळे आणि इतर साहित्य घेऊन जात होते.

Indian Army - Poonch Terror Attack
Terrorism in J&K: दोन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये 473 दहशतवादी घटना घडल्या

तसेच, पूंछ आणि राजौरीमध्ये लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाचे सुमारे 2,000 जवान शोध मोहिमेत गुंतले आहेत. अलीकडेच अँटी फॅसिस्ट फ्रंट नावाच्या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि दोन फोटोही प्रसिद्ध केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com