Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची शेवटची इच्छाही अपूर्णच, IMF कडून मदतीस नकार

Pakistan Latest News: पाकिस्तान सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पाकिस्तानच्या शेवटच्या आशेलाही मोठा धक्का बसला आहे.
Pakistan Crisis
Pakistan CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Latest News: पाकिस्तान सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पाकिस्तानच्या शेवटच्या आशेलाही मोठा धक्का बसला आहे. होय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि पाकिस्तान सरकारमध्ये $1.1 अब्जच्या मदत पॅकेजबाबत कोणताही करार झाला नाही.

पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी हे पॅकेज अत्यंत महत्त्वाचे होते. दहा दिवसांच्या चर्चेनंतरही दोन्ही पक्षांमध्ये पॅकेजबाबत कोणताही करार होऊ शकला नाही.

व्हर्च्युअल मोडमध्ये चर्चा सुरु राहील

वॉशिंग्टनस्थित आयएमएफने (IMF) सांगितले की, 'येत्या काही दिवसांत ही चर्चा व्हर्च्युअल मोडमध्ये सुरु राहील.' पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे.

आर्थिक पडझड टाळण्यासाठी त्याला यावेळी आर्थिक मदत आणि IMF कडून मदत पॅकेजची गरज आहे. नववी चर्चाही सध्या प्रलंबित राहिली. पुढील हप्ता म्हणून $1.1 अब्ज जारी केले जातील.

Pakistan Crisis
Pakistan Economic Crisis: 'खिशात नाही पैसा अन्...', कंगाल पाकिस्तानचा शौकच निराळा; वाचा संपूर्ण प्रकरण

बेरोजगारी आणि गरिबी वाढेल

पाकिस्तान (Pakistan) कंगाल झाला तर जगात तो आपली प्रतिष्ठा गमावून बसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर जगात पाकिस्तानी रुपयाचे मूल्य संपेल. पाकिस्तानची आयात पूर्णपणे ठप्प होईल. देशात बेरोजगारी आणि गरिबी वाढेल. पाकिस्तानच्या चलन साठ्यात घट झाल्यास तेथील मध्यवर्ती बँक इतर देशांना पैसे देऊ शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com