Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचा खेळ संपला? 75 वर्षांच्या इतिहासात...!

Pakistan Economic Crisis Latest Updates: पाकिस्तान सध्या आपल्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak

Pakistan Economic Crisis Latest Updates: पाकिस्तान सध्या आपल्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. परकीय चलनाचा साठा दिवसेंदिवस संपत चालला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज मिळवण्यासाठी धावपळ करत आहे.

आयएमएफची टीम सध्या पाकिस्तानमध्ये आहे. कर्जाच्या बदल्यात पाकिस्तान त्यांच्या अटी मान्य करायला किती तयार आहे हे पाहावे लागणार आहे. सरकार आणि IMFच्या टीममधील चर्चा अयशस्वी झाल्यास पाकिस्तान कंगाल होऊ शकतो, ज्याचा फटका तेथील जनतेला सहन करावा लागेल.

पाकिस्तान कंगाल

वित्त तज्ज्ञांच्या मते, जर पाकिस्तान (Pakistan) कंगाल झाला तर त्याची जगातली प्रतिष्ठा नष्ट होईल. त्यामुळे जगभरातील पाकिस्तानी रुपयाचे मूल्य संपुष्टात येईल. पाकिस्तान बाहेरुन काहीही आयात करु शकणार नाही, ज्यामुळे त्याची अर्थव्यवस्था ठप्प होईल. बुडत्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील बेरोजगारी आणि गरिबी शिगेला पोहोचणार आहे. देशात गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या घटना वाढतील.

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: गाढवांच्या भरोसे कंगाल पाकिस्तान, तर चीन डुकरांवर अवलंबून...!

विदेशी गुंतवणूक पाकिस्तानातून जाईल

वित्त तज्ज्ञांच्या मते, जर पाकिस्तानचा चलन साठा कमी झाला, तर तिथली सेंट्रल बँक इतर देशांना पैसे देऊ शकणार नाही. यासोबतच रेटींग एजन्सीज मूडीज आणि S&P पाकिस्तानचे रेटिंग कमी करेल. त्यामुळे पाकिस्तानात असलेली विदेशी गुंतवणूकही निघून जाईल.

दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपत चालला आहे. जर परकीय चलनाचा साठा संपला तर त्याला जगातून या जीवनावश्यक गोष्टी मिळू शकणार नाहीत, त्यामुळे संपूर्ण देश ठप्प राहील.

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: तोंड बोलतं अन्...! पाक PM च्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण

तसेच, पाकिस्तान सरकारला (Government) आयएमएफकडून बेलआउट पॅकेजची गरज आहे. आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांनी देशाला विनाशापासून वाचवण्यासाठी जास्तीत जास्त रक्कम पाकिस्तानला पाठवावी, असे आवाहन पाकिस्तान सरकारकडून करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com