पाकिस्तानने चीनकडून 25 लढाऊ विमाने केली खरेदी

पाकिस्तान धार मिळविण्यासाठी नवीन मल्टीरोल ऑल-वेदर जेट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता.
Pakistan bought 25 fighter aircraft from China

Pakistan bought 25 fighter aircraft from China

Dainik Gomantak

Published on
Updated on

भारताने फ्रान्सकडून राफेल जेट खरेदी केल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने चीनकडून 25 J-10C लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी बुधवारी ही माहिती दिली. आपल्या गावी रावळपिंडी येथे पत्रकारांशी बोलताना शेख रशीद यांनी सांगितले की, चीनकडून (China) खरेदी केलेली ही विमाने 23 मार्च रोजी होणाऱ्या पाकिस्तान (Pakistan) दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील.

मात्र, यावेळी त्यांनी वारंवार विमानांचे नाव J-10C ऐवजी JS-10 असे म्हटले. गेल्या वर्षी पाकिस्तान आणि चीन यांच्या संयुक्त सरावात J-10C विमानांनीही भाग घेतला होता आणि पाकिस्तानी तज्ञांना ही विमाने जवळून पाहण्याची संधी मिळाली. पाकिस्तानकडे अमेरिकेच्या F-16 विमानांचा ताफाही आहे, जे राफेलसारखेच आहेत. पण असे असूनही, पाकिस्तान धार मिळविण्यासाठी नवीन मल्टीरोल ऑल-वेदर जेट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता.

<div class="paragraphs"><p>Pakistan bought 25 fighter aircraft from China</p></div>
कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रोनने अमेरिकेत केला कहर

पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने 26-27 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानातील 300 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी 2019 रोजी, पाकिस्तानी हवाई दलाने रागाच्या भरात भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाने ते हाणून पाडले. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी विंग कमांडर असलेले अभिनंदन मिग-21 उडवत होते. त्याच विमानातून त्यांनी पाकिस्तानचे F-16 पाडले. मिग-21 वरून F-16 खाली पाडल्याबद्दल अभिनंदन यांचे जगभरात कौतुक झाले. यामुळे अमेरिकेलाही धक्का बसला. त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. याचे कारण F-16 हे अत्यंत प्रगत लढाऊ विमान होते, जे अमेरिकेने बनवले होते. तर मिग-21 हे 60 वर्ष जुने रशियन बनावटीचे विमान होते. भारताने 1970 च्या दशकात रशियाकडून मिग-21 खरेदी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com