कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रोनने अमेरिकेत केला कहर

यूएसमध्ये कोविड-19 लसीकरण सुरू झाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ, संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
New variant of Corona wreaked havoc in America

New variant of Corona wreaked havoc in America

Dainik Gomantak

Published on
Updated on

यूएसमध्ये, ओमिक्रॉन प्रकारांमुळे कोविड प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या सात दिवसांत यूएसमध्ये सुमारे 258,312 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यूएसमध्ये कोविड-19 (Covid-19) लसीकरण (Vaccination) सुरू झाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ, संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यूएसमध्ये (US) दररोज सरासरी 2,65,000 नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे (Omicron Variant) नवीन रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ झाली आहे.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या मध्यात कोविड-19 च्या रोजच्या नवीन रुग्णांची संख्या 250,000 होती. कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले बहुतांश कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विमानसेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हजारो उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

<div class="paragraphs"><p>New variant of Corona wreaked havoc in America</p></div>
'ओमिक्रॉनचा प्रसार होऊ द्या, सर्वांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती होईल विकसित'

यूएसमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही दररोज सरासरी 1200 वरून सुमारे 1500 पर्यंत वाढली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने सांगितले की 86 क्रूझ जहाजांवर कोविड -19 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

सीडीसीच्या संचालक रोशेल व्हॅलेन्स्की यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आमच्याकडे काही देशांमधील काविडच्या ओमिक्रॉन डेटाबद्दल माहिती आहे. या प्रकाराचा अमेरिकेवर कसा परिणाम होईल याविषयी सध्यातरी आम्ही काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. ते पुढे म्हणाले की, युनायटेड स्टेट्सच कोविड लसीकरणाच्या असमानतेच्या समस्येशी झुंजत असताना हे सांगणे अधिक कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com