VIDEO: 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानं पाक जनरलला झोंबल्या मिरच्या; भाषेवरुन टीका करणाऱ्या जनरलची पाकिस्तानमध्येच नाचक्की

Pakistan Social Media Trolls DG ISPR: भारतीय जवानांच्या पराक्रमासमोर जेव्हा शत्रूचे धैर्य खचते, तेव्हा तो बिनबुडाचे आरोप करु लागतो.
Pakistan Social Media Trolls DG ISPR
Pakistan DG ISPRDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Social Media Trolls DG ISPR: भारतीय जवानांच्या पराक्रमासमोर जेव्हा शत्रूचे धैर्य खचते, तेव्हा तो बिनबुडाचे आरोप करु लागतो. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंग असलेल्या 'आयएसपीआर'चे (ISPR) महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी केला. 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय लष्कराने आयोजित केलेली संयुक्त पत्रकार परिषद पाहून या पाकिस्तानी जनरलची प्रचंड चिडचिड झाली. मात्र, ही चिडचिड सामरिक मुद्द्यांवर नसून भाषेवरुन होती, ज्यावरुन आता त्यांच्यावरच उपहासात्मक टीका होत आहे.

7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारताने कशा प्रकारे पाकिस्तानचे 11 एअरबेस हादरवले आणि दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स उद्ध्वस्त केले, याची सविस्तर माहिती देण्यात आली. भारताचा हा गौरवशाली इतिहास आणि लष्करी सामर्थ्य पाहून खवळलेल्या अहमद शरीफ चौधरी यांनी एक विचित्र प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "भारतीय लष्करी अधिकारी इंग्रजीमध्ये का बोलत होते? त्यांना जगाला आपली कहाणी सांगायची आहे का?". त्यांच्या या विधानाने त्यांच्यातील वैफल्य स्पष्टपणे दिसून आले.

Pakistan Social Media Trolls DG ISPR
Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

मात्र, जनरल चौधरी यांचे हे विधान त्यांच्यावरच उलटले. पाकिस्तानचेच माजी लष्करी अधिकारी आणि पत्रकार मेजर आदिल फारुख राजा (निवृत्त) यांनी चौधरींना आरसा दाखवत खडे बोल सुनावले. मेजर राजा यांनी पाकिस्तानी लष्कराचा ढोंगीपणा उघड करताना सांगितले की, ज्यांचे स्वतःचे घर काचेचे आहे, त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये. पाकिस्तानी लष्करामध्ये आजही उच्च स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत सर्व महत्त्वाचे निर्देश आणि कामकाज केवळ इंग्रजी भाषेतच चालते. पाकिस्तानी अधिकारी उर्दूचा वापर केवळ त्यांच्या सामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Pakistan Social Media Trolls DG ISPR
Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

मेजर राजा यांनी पुढे असा प्रश्न विचारला की, भाषेवर निरर्थक चर्चा करण्यापेक्षा पाकिस्तानने हे का सांगितले नाही की भारताने त्यांच्या 11 एअरबेसचे किती नुकसान केले आहे? केवळ माजी अधिकारीच नाही, तर सामान्य पाकिस्तानी नागरिकही सोशल मीडियावर जनरल चौधरींची खिल्ली उडवत आहेत. 'एक्स' आणि 'रेडिट' सारख्या प्लॅटफॉर्मवर युजर्सनी पाकिस्तानी लष्कराला 'खोट्याची फॅक्टरी' संबोधले. काही युजर्सनी तर चौधरींचे एआय-जनरेटेड फोटो शेअर करुन त्यांचा निषेध केला. अहमद शरीफ चौधरी हे संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या महमूद सुलतान बशीर-उद-दीन या दहशतवाद्याचे पुत्र असून, त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानी लष्कराची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नाचक्की झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com