घाना देशात 'एव्हियन फ्लू' चा प्रकोप !

घानामध्ये (Ghana) एव्हीयन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे 10,000 हून अधिक पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
Chicken
ChickenDainik Gomantak
Published on
Updated on

जग कोरोनाशी झुंज देत आहे. चीनपासून (China) सुरु झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पोहोचला. दुसरीकडे, कोरोनामध्ये इतर रोगांचा धोका देखील कमी झालेला नाही. अनेक देशांमध्ये 'एव्हियन फ्लू' (Avian Flu) चा फैलाव होण्याचा धोका आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घानामध्ये (Ghana) एव्हीयन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे 10,000 हून अधिक पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

अन्न व कृषी मंत्रालयाच्या पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाचे संचालक (एमओएफए) पॅट्रिक अबेकेह (Patrick Abekeh) यांनी शनिवारी रात्री सिन्हुआ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ग्रेटर अक्र्रा, व्होल्टा आणि मध्य भागातील सात कृषी क्षेत्रांमध्ये एव्हियन प्लूच्या उद्रेकाची शक्यता वर्तवली आहे. अबेकेह यांनी पुढे सांगितले की, 5811 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच पशुचिकित्सा विभागाने 4500 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची नोंद दिली.

Chicken
Monkeypox Virus: ची अमेरिकत दहशत; जाणून घ्या आजार

मानवालाही संसर्गाचा धोका

तर आतापर्यंत या प्रादुर्भावाने एकूण 10,311 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक बाधित कृषी क्षेत्रातील पक्षांची हत्या करणे आवश्यक बनले आहे. नैसर्गिक चक्रानुसार बर्ड प्लूचा धोका मानवाला आहे. यामध्ये फार्महैंड आणि संक्रमित पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा यामध्ये समावेश होतो. हा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने अद्यापपर्यंत मानवाला संसर्गाची लागण झाली असल्याचे कोणतेही प्रकरण आढळलेले नाही.

Chicken
Covid 19: इंडोनेशियात कोरोना नियम मोडणाऱ्यांना दिली जातेय अनोखी शिक्षा

अमेरिकेत 'मंकीपॉक्स' ची दहशत

अमेरिकेच्या (America) टेक्सासमध्ये एका व्यक्तीला दुर्मिळ 'मंकीपॉक्स' (Monkeypox) ची लागण झाल्याचे आढळले आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) शुक्रवारी ही माहिती दिली. अशाप्रकारे टेक्सासमध्ये या संसर्गाची लागण झालेली पहिलीच घटना आहे. नुकतच नायजेरिया ते अमेरिका प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला या संसर्गाची लागण झाली आहे. सध्या डल्लासमधील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. डल्लास काऊंटीचे न्यायाधीशांनी म्हटले की, मंकीपॉक्स आजार हा दुर्मिळ आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा धोका सध्या सर्वसामान्य नागरिकांना नाही मात्र नायजेरिया व्यतीरिक्त या व्हायरसचा प्रसार मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com