Kabul
KabulDainik Gomantak

Chinese Hotel Attack: काबूलमध्ये मोठा स्फोट, हॉटेलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी केला गोळीबार; Video

Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट झाला असून, स्फोटाच्या ठिकाणी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे.
Published on

Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट झाला असून, स्फोटाच्या ठिकाणी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे. चिनी व्यावसायिकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या गेस्ट हाऊसजवळ हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर हॉटेलमध्ये घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला आहे.

दरम्यान, ज्या हॉटेलवर हल्लेखोरांनी हल्ला केला, ते बहुमजली कॉम्प्लेक्स आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर अज्ञात हल्लेखोर हॉटेलमध्ये घुसले होते. तालिबान (Taliban) सरकारचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले आहे. गोळीबार अद्याप सुरुच आहे.

Kabul
Terrorism in Pakistan: तालिबान ठरले पाकिस्तानसाठी धोकादायक, 1 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 51% वाढ

दुसरीकडे, या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'हा स्फोट खूप मोठा होता, त्यानंतर गोळीबार झाला.' मात्र, या स्फोटाबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट काबूलच्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या शेहर-ए-नऊमध्ये झाला.

अलीकडच्या काळात, तालिबान सत्तेत परतल्यानंतर, मोठ्या संख्येने चिनी व्यापारी अफगाणिस्तानात (Afghanistan) येत आहेत. अफगाणिस्तानशी 76 किलोमीटरची सीमा असलेल्या चीनने तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. असे असूनही, चीन अशा काही देशांपैकी एक आहे, ज्यांनी तिथे राजनैतिक उपस्थिती कायम ठेवली आहे. बीजिंगने येथे दूतावासही स्थापन केला आहे.

Kabul
अफगाणिस्तानची भूमी इतर देशांवरील हल्ल्यांसाठी वापरु देणार नाही: तालिबान

तसेच, सत्ताबदलानंतर तालिबान सरकार राष्ट्रीय सुरक्षा सुधारण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा सातत्याने करत आहे, मात्र त्यानंतरही बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटना थांबत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com