Pakistan: आयएसआय अन् पाकिस्तान सरकारची पोल खोल; सिंधमधील पत्रकार, लेखक...!

Pakistan Government: पाकिस्तान सरकारने गेल्या 75 वर्षांपासून सिंधचा केवळ वसाहत म्हणून वापर केला आहे. पाकिस्तान सरकारने आर्थिक शोषण करुन सिंधला गुलाम बनवून ठेवले आहे.
Sindh Protest Against Pakistan
Sindh Protest Against PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Government: पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 52 व्या सत्रादरम्यान, एका सिंधी कार्यकर्त्याने आयएसआयला फटकारले.

आयएसआयवर गंभीर आरोप करत या कार्यकर्त्याने सरकारलाही गोत्यात आणले. त्याने म्हटले की, पाकिस्तान सरकारने गेल्या 75 वर्षांपासून सिंधचा केवळ वसाहत म्हणून वापर केला आहे. पाकिस्तान सरकारने आर्थिक शोषण करुन सिंधला गुलाम बनवून ठेवले आहे.

जे सिंध मुत्ताहिदा महाज जेएसएमएम नावाच्या संघटनेचे कार्यकर्ते सज्जाद शार म्हणाले की, पाकिस्तान 75 वर्षांपासून सिंधचा (Sindh) वसाहत म्हणून वापर करत आहे. तो सिंधमधील लोकांपासून त्यांची मातृभूमी, संस्कृती, भाषा आणि राजकीय स्वातंत्र्य हिरावून घेत आहे.

Sindh Protest Against Pakistan
Pakistan Inflation: कंगाल पाकिस्तानमध्ये महागाईने मोडले सर्व विक्रम , इतिहासात प्रथमच वाढली एवढी महागाई

'आयएसआय सिंधमधील लोकांचा आवाज दाबत आहे'

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान सरकार सिंधमधील आर्थिक संसाधने, खनिजे आणि राष्ट्रीय संपत्तीची लूट करत आहे. तर आयएसआय (ISI) पत्रकार, लेखक, कवी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना सिंधमधून हद्दपार करत असून त्यांचा आवाज दाबत आहे.

ते म्हणाले की, माझ्या संस्थेला मानवाधिकार आणि राष्ट्रीय अस्तित्वाच्या मुद्द्याकडे संयुक्त राष्ट्र संघाचे लक्ष वेधायचे आहे, ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सिंधमधील लोक गेल्या 75 वर्षातील सर्वात वाईट काळात जगत आहेत.

गेल्या 75 वर्षांपासून पाकिस्तानातील सिंधमधील लोक गुलामगिरी, अपमान, राजकीय दडपशाही आणि आर्थिक शोषणाच्या अत्यंत वाईट टप्प्यात जगत आहेत. पाकिस्तान सिंधला वसाहत मानतो.

Sindh Protest Against Pakistan
India Pakistan Relations: भारताच्या समर्थनार्थ पाकिस्तानी मीडिया, 'संबंध सुधारण्याची वेळ आली...'

सज्जाद म्हणाले की, पाकिस्तान सिंधमधील खनिजे, संसाधने आणि राष्ट्रीय संपत्ती लुटत आहे. सिंधमधील पत्रकार, लेखक, कवी, मानवाधिकार कार्यकर्त्यांसह राजकीय कार्यकर्त्यांना ISI ने गायब केले आहे आणि त्यांचा आवाज बंद केला जात आहे.

अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले आहे

सज्जाद म्हणाले की, आजही जेएसएमचे नेते एजाज गाहू, सोहेल भाटी यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्ते आयएसआयच्या टॉर्चर सेलमध्ये बंद आहेत.

राजकीय कार्यकर्ते मुझफ्फर भुट्टो आणि इतरांच्या विकृत मृतदेहांची आयएसआयने विल्हेवाट लावली आहे. हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे आयएसआयच्या टॉर्चर सेलमध्ये बंद होते.

Sindh Protest Against Pakistan
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला मोठा झटका, व्यापार तूट रोखण्याच्या प्रयत्नात बेरोजगारीचा भडका!

सिंधी कार्यकर्त्याने शेवटी सांगितले की, सिंधचे नेते कुर्बान खुहवार आणि इतरांना जिवंत जाळण्यात आले.

पाकिस्तानमध्ये अहमदी, शिया आणि हिंदू या अल्पसंख्याकांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही यावर गंभीर व्हायला हवे. यासोबतच पाकिस्तान सरकारनेही हा प्रश्न सोडवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com