Pakistan Inflation
Pakistan InflationDainik Gomantak

Pakistan Inflation: कंगाल पाकिस्तानमध्ये महागाईने मोडले सर्व विक्रम , इतिहासात प्रथमच वाढली एवढी महागाई

पाकिस्तानमध्ये महागाइचे दर गगनाला भिडले आहेत.

Pakistan Inflation: कंगाल पाकिस्ताानची परिस्थिती अजुनच बिकट होत चालली आहे. छोट्या वस्तु खरेदी करण्यासाठी देकील अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये महागाइचे दर गगनाला भिडले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महागाई एवढी वाढली आहे. 

पाकिस्तान सांख्यिकी ब्युरोने शुक्रवारी सांगितले की, खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा दर इतका वाढला आहे. तेसच आठवड्यात महागाई दर 1.80 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात अल्पकालीन वार्षिक चलनवाढीचा दर 45.64 टक्के होता. 

  • 26 वस्तूंच्या किमती वाढल्या 

गेल्या आठवडाभरात पाकिस्तानमध्ये 26 वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत तर 12 वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. तर 13 वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. टोमॅटोचा दर 71.77 टक्के, गव्हाच्या पिठाचा भाव 42.32 टक्के, बटाट्याचा भाव 11.47 टक्के, केळी 11.07 टक्के, ब्रँडेड चहा 7.34 टक्के, साखर 2.70 टक्के, डाळ मॅश 1.57 टक्के आणि गुळाचा भाव 1.03 टक्के वाढला आहे.

Pakistan Inflation
Muslims In China: रमजानच्या महिन्यात चीन मुस्लिमांवर करतोय अत्याचार, ड्रॅगनने दिला 'हा' आदेश
  • या गोष्टींच्या किंमतीत घसरण

ज्या वस्तूंच्या किमतीत घसरण झाली त्यात चिकनचे मांस 8.14%, मिरची पावडर 2.31%, LPG 1.31%, मोहरीचे तेल 1.19%, लसूण 1.19%, स्वयंपाकाचे तेल 0.21%, कडधान्ये यांचा समावेश आहे. मूग 0.17%, मसूर 0.15% आणि अंडी 0.03% वाढली आहेत.

  • सर्वात महाग वस्तू 

वर्षभरात कांद्याच्या भावात सर्वाधिक 228.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर सिगारेटच्या किमतीत 165.88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत गव्हाच्या पिठात 120.66 टक्के, गॅसच्या किमतीत 108.38 टक्के आणि डिझेलच्या किमतीत 102.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राउंड मिरचीची सर्वात मोठी 9.56 टक्के घट आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com