Iran: इराणमध्ये दर सहा तासाला एकाला फाशी, मानवाधिकार अहवालातून धक्कादायक माहिती समोर

इराण सरकारवर यापूर्वीही गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Iran
Iran
Published on: 
Updated on: 

इराण सरकार गेल्या 10 दिवसांपासून सरासरी दर सहा तासांनी एका व्यक्तीला फाशी देत आहे. इराण मानवाधिकार अहवालानुसार, इराणच्या अधिकाऱ्यांनी 2023 मध्ये 194 लोकांना फाशी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांत इराणमध्ये मारल्या गेलेल्या 42 लोकांपैकी निम्मे हे इराण-पाकिस्तान सीमेवरील बलुचिस्तान भागातील होते.

अनेकांना अमली पदार्थांच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. इराण सरकारवर यापूर्वीही गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने बलुच अल्पसंख्याकांविरुद्ध फाशीच्या शिक्षेत मोठी वाढ केली आहे, असे डेलीस्टारच्या वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरातून आवाज उठवला जात असताना देखील दुहेरी नागरिकत्व असलेल्या अनेक इराणींनाही फाशी देण्यात आली आहे.

शनिवारी स्वीडिश-इराणी दुहेरी नागरिक हबीब फराजुल्लाह चाब याला फाशी देण्यात आली. स्वीडिश सरकारकडून या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

खुजेस्तान प्रांतातील लष्करी परेडवर 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे चहाबचा हात असल्याचा दावा इराणी वकिलांनी केला आहे. या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले होते.

Iran
टेक्सासमध्ये भरधाव रेंज रोव्हरने सात जणांना चिरडले, व्हेनेझुएला येथील होते स्थलांतरित

इराणचे माजी उप-संरक्षण मंत्री, अलीरेझा अकबरी यांना जानेवारीमध्ये ब्रिटीश सरकारला आण्विक रहस्ये हस्तांतरित केल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली होती. 62 वर्षीय अकबरी हे एमआय-6 एजंट असल्याचा दावा इराणने केला आहे. जरी ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने त्याच्याशी कोणताही सहभाग स्वीकारला नाही.

हिजाबविरोधी निदर्शनांदरम्यान इराणने 2022 मध्ये 582 लोकांना फाशी दिली होती. 2005 ते 2015 या कालावधीत सुमारे 73 मुलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेला प्रत्येक इराणी तरुण फाशीपर्यंत पोहोचण्यापूर्वी सरासरी सात वर्षे तुरुंगात घालवतो. बर्याच बाबतीत ते 10 वर्षे देखील आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला फाशी देण्यास मनाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com