टेक्सासमध्ये भरधाव रेंज रोव्हरने सात जणांना चिरडले, व्हेनेझुएला येथील होते स्थलांतरित

रेंज रोव्हर कारने रविवारी टेक्सासच्या ब्राउन्सविले येथे हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात की जाणीवपूर्वक केलेले कृत्य याचा तपास सुरू आहे.
Texas Car Accident
Texas Car Accident Twitter

Texas Car Accident: अमेरिकेतील दक्षिण टेक्सासमध्ये एका भरधाव कारने स्थलांतरित लोकांच्या एका समूहाला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.

रेंज रोव्हर कारने रविवारी टेक्सासच्या ब्राउन्सविले येथे हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात की जाणीवपूर्वक केलेले कृत्य याचा तपास सुरू आहे.

टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेघर लोकांची सेवा करणाऱ्या निर्वासित केंद्राबाहेर जमलेल्या निर्वासितांमध्ये कार चालकाने वळवली. ब्राउन्सविले पोलिस विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी ड्रायव्हरची ओळख पटलेली नाही. आरोपीला पोलीस कोठडीत घेण्यात आले असून त्याच्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस टॉक्सिकॉलॉजीच्या (नशा संबधित अहवाल) अहवालाची वाट पाहत आहेत.

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले की जाणूनबुजून वाहनाला धडक दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर किमान 10 लोकांनाही रुग्णालयात दाखल करण्याच आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Texas Car Accident
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, कर्नाटक भाजप नेत्याविरोधात गोव्यात तक्रार दाखल

चिरडले गेलेले बहुतांश स्थलांतरित व्हेनेझुएला येथील असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

'ड्रायव्हरने सुमारे 20 लोकांना चिरडण्यापूर्वी सिग्नल तोडला होता. यानंतर सर्वत्र अपघातग्रस्त लोक दिसत होते. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला लोकांच्या एका गटाने पकडले.

दरम्यान, बस स्टॉपवर उभ्या असलेल्या लोकांना उडवल्यानंतर या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com