NSA बैठकीचे पुढील महिन्यात भारतात आयोजन, पाकिस्तान देखील होणार सहभागी?

पाकिस्तान (Pakistan) देखील या बैठकीचा एक भाग असेल. अशा परिस्थितीत या परिषदेत पाकिस्तान काय भूमिका घेणार? पाकिस्तान एनएसए मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पाकिस्तान एनएसए (NSA) मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार ?
पाकिस्तान एनएसए (NSA) मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार ?Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) पुढील महिन्यात अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर एनएसएस (NSA) स्तरावरील बैठक आयोजित करणार आहे. या बैठकीसाठी ज्या देशांना बोलावले जाईल त्यामध्ये रशिया (Russia) आणि पाकिस्तान (Pakistan) यांचा समावेश आहे. या प्रादेशिक परिषदेसाठी चीन (China), इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनाही आमंत्रित केले जाऊ शकते. ही बैठक युद्धग्रस्त देशाच्या सुरक्षेची परिस्थिती आणि तालिबानची मानवी हक्क राखण्याची गरज तसेच मानवीय संकट हाताळण्यावर आधारित असेल.

पाकिस्तान एनएसए (NSA) मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार ?
"भारत-पाकिस्तान सीमेवर लढा,आम्हाला दूर ठेवा'' तालिबानचं मोठं वक्तव्य

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) राष्ट्रीय हे या परिषदेचे अध्यक्षपदी असण्याची शक्यता आहे. ही परिषद सुरक्षा सचिवालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे. मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला तालिबानला आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर रशियाने 20 ऑक्टोबर रोजी मॉस्को फॉरमॅट चर्चेसाठी तालिबानला आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारतही सहभागी होणार आहे. पण भारत सरकार आता दिल्लीत होणाऱ्या परिषदेत त्यांचा समावेश करण्याबाबत सावध दिसत आहे. सर्वसमावेशक सरकारचा अभाव हे यामागील कारण आहे.

पाकिस्तान एनएसए (NSA) मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार ?
तालिबान आणि अमेरिकेत पहिल्यांदाच चर्चा

या अटीवर भारत पाकिस्तानसोबत काम करण्यास तयार

पाकिस्तान देखील या बैठकीचा एक भाग असेल. अशा परिस्थितीत या परिषदेत पाकिस्तान काय भूमिका घेणार? पाकिस्तान एनएसए मोईद युसूफ (Moid Yusuf) या परिषदेत सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांना लगाम घातला पाहिजे असे भारताचे मत आहे. मात्र, भारताने पाकिस्तानविरुद्ध काम करण्यास तयार असल्याचे संकेतही दिले आहेत. बशर्ते इस्लामाबाद सीमापार दहशतवाद थांबवेत. भारताने पाकिस्तानमध्ये एससीओच्या दहशतवादविरोधी प्रशिक्षणासाठी तीन वरिष्ठ अधिकारी पाठवूनही हे दाखवून दिले आहे.

पाकिस्तानी एनएसए मोईद युसुफ भारतात आले, तर बऱ्याच काळानंतर पाकिस्तानच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ही भेट असेल. यापूर्वी, 2016 मध्ये, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी अमृतसरला गेले होते. भारताने या वर्षी मे महिन्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर परिषद घेण्याचे ठरविले होते आणि युसुफही त्यात सहभागी होणार होते. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परिषद आयोजित करता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com