Deutsche Bank: अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीमुळे सुरू झालेले बँकिंग संकट हळूहळू संपूर्ण जगाच्या बँकिंग प्रणालीला विळखा घालत आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर अमेरिकेची सिग्नेचर बँक, स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस बँकही अडचणीत आली.
त्यानंतर आता हे जागतिक बँकिंग संकट जर्मनीपर्यंत पोहोचले आहे. जर्मनीतील सर्वात मोठी डॉईश या बँकेची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. (Bank Crisis 2023)
बँकिंग व्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांत अनिश्चिततेचे वातावरण आहे. शुक्रवारी डॉइश बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री दिसून आली. या जर्मन बँकेची एकूण मालमत्ता 1.4 ट्रिलियन डॉलर आहे. बँकेला 2022 मध्ये एकूण 6 अब्ज डॉलर्सचा नफा झाला होता.
शुक्रवारी डॉइश बँकेचे समभाग 15 टक्क्यांहून अधिक घसरले. यानंतर शेअर्समध्ये काही सुधारणा झाली आणि एकूण 8 टक्क्यांच्या घसरणीसह तो 8.54 युरोवर बंद झाला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की बँकेच्या शेअर्समध्ये झालेली घसरण केवळ जागतिक बँकांवरील प्रचंड दबावामुळे नाही तर बँकेच्या क्रेडिट-डिफॉल्ट स्वॅप इन्शुरन्सची किंमत 2020 च्या तुलनेत अनेक पटींनी वाढली आहे.
अशा स्थितीत बँकेच्या भागधारकांमध्ये अविश्वास निर्माण झाला असून समभागांची विक्री जोरात सुरू झाली आहे. क्रेडिट-डिफॉल्ट स्वॅप विमा हा एक प्रकारचा विमा आहे जो बँका डीफॉल्टच्या बदल्यात कंपनी किंवा ब्रँडला प्रदान करतात.
जर्मनीतील सर्वात मोठी बँक
डॉईश बँक ही जर्मनीतील सर्वात मोठी बँक आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत या बँकेची भूमिका महत्त्वाची आहे. जर्मनीसह इतर देशातही ही बँक कार्यरत आहे. ही बँक जगातील सर्वात सुरक्षित बँकांपैकी एक मानली जाते. ही बँक सहसा सर्वाधिक कॉर्पोरेट कर्ज देते.
त्यामुळे या बँकेवरील संकट हे संपुर्ण युरोपवरील संकट ठरू शकते. दरम्यान, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी म्हटले आहे की युरोपची बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आहे. गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.