North Korea Tests new missile: उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बड्या देशांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत एका न्यूक्लियर मिसाईलची चाचणी केली आहे. विशेष म्हणजे, हे न्युक्लियर मिसाईल खोल पाण्यातून डागता येणारे आहे. त्यामुळे या मिसाईलचा शोध घेणे (डिटेक्ट) किंवा ते रोखणे (इंटरसेप्ट) अत्यंत अवघड असणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरपासून उत्तर कोरियाने नवीन क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांना सुरवात केली आहे, ती अद्यापही सुरूच आहे. ठराविक दिवसांच्या अंतराने उत्तर कोरियाकडून नवनीवन क्षेपणास्त्रांची चाचणी केली जात आहे. गेल्या 14 दिवसात अशा 12 क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने केली असून यातील बहुतांश क्षेपणास्त्रे ही न्यूक्लियर असून ती लघु पल्ल्याची आहेत.
तथापि, या अंडरवॉटर मिसाईलची चाचणी उत्तर कोरियाने कुठे घेतली, हे समोर आलेले नाही. काही वर्षांपुर्वीही अशाच एका चाचणीच्या स्थळाचे छायाचित्र समोर आले होते. काही दिवसांपुर्वीच उत्तर कोरियाने अमेरिका, जपान या राष्ट्रांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्यानंतर जपानने देशात इमर्जन्सी अलर्ट जारी केला होता. तर दक्षिण कोरियाने ही भडकावणारी कृती असल्याचे म्हटले आहे. या चाचणीनंतर अमेरिकेने उत्तर कोरियावर नव्याने निर्बंध लावले आहेत.
उत्तर कोरियाने अमेरिकेपासून संरक्षणासाठी ही क्षेपणास्त्र चाचणी केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या चाचण्या उत्तर कोरिया अशा वेळी करत आहे, जेव्हा उत्तरकोरियाच्या सीमेपासून काही अंतरावरच समुद्रात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याचा युद्धसराव सुरू आहे.
उत्तर कोरियन लष्कराने म्हटले आहे की, आम्ही पहिल्यांदाच अशा लघु पल्ल्याच्या मिसाईलची चाचणी केली आहे जे कुठल्याही नदी, तलाव किंवा समुद्रातून पाण्याखालून हल्ला करू शकते. त्यासाठी स्पेशल अंडरवॉटर लाँच पॅड बनवला गेला आहे. त्याला अंडरवॉटर सायलो असे म्हणतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे डिटेक्ट आणि इंटरसेप्ट करणे अतिषय अवघड असते.
या चाचणीवेळी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन उपस्थित होते. जानेवारीपासून आत्तापर्यंत उत्तर कोरियाने 25 क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. यात हायपरसॉनिक मिसाईचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
अणुयुद्धाचे संकट?
उत्तर कोरियाने स्वतःला अण्वस्त्रसंपन्न घोषित केले असून त्यासाठी नवा कायदाही बनवला आहे. या कायद्यानुसार जर उत्तर कोरियाला धोका असेल तर ज्या देशाकडून धोका आहे, अशा देशावर उत्तर कोरिया अणुबॉम्बद्वारे हल्ला करू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.