North Korea Order: उत्तर कोरियचा तालिबानी फर्मान, 'मुलांची नावं ठेवण्यासाठी बॉम्ब, बंदूक...'

Kim Jong Un Family: उत्तर कोरियातील पालकांना एक विचित्र आदेश मिळाला आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना त्यांच्या मुलांची नावे बॉम्ब, बंदूक आणि सॅटेलाइट यावर आधारित ठेवण्यास सांगितले आहे.
Kim Jong Un
Kim Jong Un Dainik Gomantak

North Korea News: उत्तर कोरियातील पालकांना एक विचित्र आदेश मिळाला आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना त्यांच्या मुलांची नावे बॉम्ब, बंदूक आणि सॅटेलाइट यावर आधारित ठेवण्यास सांगितले आहे. वास्तविक, उत्तर कोरियाला त्या नावांच्या वापरावर कडक कारवाई करायची आहे.

यापूर्वी, कम्युनिस्ट सरकारने दक्षिण कोरियाप्रमाणे लोकांना ए री (लव्हड वन) सु मी (सुपर ब्युटी) सारखी गोंडस नावे वापरण्याची परवानगी दिली होती. पण आता सरकारने लोकांना आदेश दिला की, अशी नावे असलेल्या लोकांना अधिक देशभक्ती दर्शवणारी, वैचारिक नावे ठेवावी लागतील.

Kim Jong Un
North Korea fires Missile: उत्तर कोरियाचा पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला; वरून अमेरिकेलाच दिली धमकी

जे न पाळतील त्यांना दंड आकारला जाईल

हुकूमशहा किम जोंग यांची अशी इच्छा आहे की, पालकांनी त्यांच्या मुलांना ही नावे द्यावी, जो कोणी या आदेशाचे पालन करणार नाही त्याला दंड आकारला जाईल. या नावांमध्ये Pok II (बॉम्ब), चुंग सिम (लॉयल्टी) आणि उई सॉन्ग (उपग्रह) यांचा समावेश आहे. रेडिओ फ्री एशियाशी बोलताना एका व्यक्तीने सांगितले की, 'लोकांच्या तक्रारी आहेत की, सरकार हवे ते नाव देण्यासाठी अधिकारी लोकांवर दबाव आणत आहेत. गेल्या महिन्यापासून लोकांना नोटिसा बजावल्या जात आहेत. नाव बदलण्यासाठी त्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत वेळ आहे.'

Kim Jong Un
North Korea vs South Korea : उत्तर-दक्षिण कोरियाची लढाऊ विमाने समोरासमोर, युद्धविमानांमुळे तणाव वाढला

आदेशाने पालक नाराज

क्रांतिकारक मानकांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या नावांना राजकीय अर्थ असावा, असे आदेशात नागरिकांना सांगण्यात आले आहे. शासनाच्या या आदेशामुळे पालक संतप्त झाले असून नाव बदलण्यास टाळाटाळ करत आहेत. व्यक्तीला नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य कसे नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, 'आपल्या नागरिकांची नावे दक्षिण कोरियाच्या नावांसारखी असू नयेत.' उत्तर कोरिया अनेकदा सीमा भागात क्षेपणास्त्र चाचण्या करत असतो, त्यामुळे दोघांमध्ये तणाव कायम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com