North Korea fires Missile: उत्तर कोरियाचा पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला; वरून अमेरिकेलाच दिली धमकी

अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; दक्षिण कोरिया, जपान तणावात
Kim Jong Un
Kim Jong UnDainik Gomantak

North Korea fires Missile: अमेरिकेने वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. उत्तर कोरियाने सर्व बड्या राष्ट्रांचा विरोध डावलून पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. त्यावरून कोरियन उपखंडात तणाव निर्माण झाला आहे.

Kim Jong Un
Iran मध्ये हल्लेखोरांकडून बेछुट गोळीबार, 5 ठार तर 10 जखमी

उत्तर कोरियाने पुर्वेकडील समुद्रात हे क्षेपणास्त्र डागले. विशेष म्हणजे, या कृतीनंतर उत्तर कोरियाने शेजारी राष्ट्रांना केलेल्या मदतीवरून अमेरिकेला धमकी दिली आहे.  उत्तर कोरियाच्या या कारवाईनंतर अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये तैनात असलेल्या आपल्या सैनिकांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत.

उत्तर कोरियाच्या या कृत्याचा अमेरिका, जपान, दक्षिण कोरियासहित संयुक्त राष्ट्रांनी देखील तीव्र निषेध केला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेमुळे वादाला सुरूवात झाली. तिन्ही देशांमधील या शिखर परिषदेनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह दोन्ही नेत्यांनी द्वीपकल्पाची क्षमता मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.

Kim Jong Un
Pakistan And USA: पाकचा USA ला इशारा, 'भारत रशियाकडून तेल खरेदी करु शकतो तर...'

उत्तर कोरियाची अमेरिकेला धमकी -

अमेरिकेच्या या हालचालींनंतर उत्तर कोरिया संतप्त झाला असून उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री ‘चो सोन-ह्यु’ यांनी कडक शब्दात अमेरिकेला सुनावलेय. “अमेरिका आपल्या मित्र देशांना जितकी मदत करेल तितकी उत्तर कोरिया कठोर कारवाई करेल. अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्यांसाठी आणखी गंभीर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिलाय”.

उत्तर कोरियाने टाकलेल्या क्षेपणास्त्रानंतर, अमेरिका अ‍ॅक्शन मोडमध्ये गेलीय. अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपानच्या सुरक्षेबाबत आपली कटिबद्धता दाखवण्यासाठी मिसावा इंस्टॉलेशन कमांडरने सर्व कर्मचार्‍यांना पुढील माहिती मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्याचे कळवले आहे. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियातील तणाव वाढलाय. अमेरिकेने उत्तर कोरियाचे हे कृत्य अतिशय गांभीर्याने घेतले असून आपल्या जवानांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना तात्काळ उत्तर जपानमधील हवाई तळावर आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com