North Korea: बायबलसह पकडलेल्या ख्रिश्चनांना उत्तर कोरियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. मुलांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. अमेरिकेन परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
स्टेट डिपार्टमेंटच्या 2022 च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालाचा अंदाज आहे की, उत्तर कोरियामध्ये (North Korea) 70,000 हून अधिक ख्रिश्चन आणि इतर धर्माचे लोक तुरुंगात आहेत.
दरम्यान, अहवालात दावा करण्यात आला आहे की, तुरुंगात टाकण्यात आलेल्यांमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा होता, ज्याला त्याच्या पालकांकडे बायबल सापडल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कुटुंबाला त्यांच्या धार्मिक प्रथा आणि बायबल बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दोन वर्षांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला 2009 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दुसरीकडे, तुरुंगात असलेल्या ख्रिश्चनांनी (Christian) भीषण परिस्थिती आणि विविध प्रकारचे शारीरिक शोषण होत असल्याचे सांगितले.
बायबल सापडलेल्या व्यक्तींना अटक केली जाऊ शकते, ताब्यात घेतले जाऊ शकते, काम करण्यास भाग पाडले जाऊ शकते, छळ केला जाऊ शकतो, न्याय्य चाचणी नाकारली जाऊ शकते, निर्वासित केले जाऊ शकते, आजीवन कारावासात टाकले जाऊ शकते, अधिकार नाकारले जाऊ शकतात किंवा लैंगिक हिंसाचाराला केला जाऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.