North Korea: किम जोंग उनच्या बहिणीने दिली अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धमकी, म्हणाली सक्त कारवाई करणार

अलिकडेच अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या युद्धविमानांसोबत संयुक्त सराव केला.
Kim Jong Un and his sister Kim Yo Jong
Kim Jong Un and his sister Kim Yo Jong

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंग आता त्या देशातील एक शक्तिशाली नेता म्हणून समोर येत आहे. किमच्या बहिणीने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धमकी दिली आहे, उत्तर कोरिया या दोन देशांविरुद्ध 'सक्त कारवाई' करण्यास तयार आहे, असे तिने म्हटले आहे.

अलिकडेच अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या युद्धविमानांसोबत संयुक्त सराव केला. अमेरिकेने कोरियन द्वीपकल्पावर आण्विक-सक्षम B-52 बॉम्बर उडवल्यानंतर किम यो जोंगने हे विधान केले आहे.

"आम्ही अमेरिकन सैन्य आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यावर बारीक लक्ष ठेऊन आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही सक्त कारवाई करण्यास तयार आहोत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी हालचाली आणि सर्व प्रकारच्या वक्तृत्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अर्थातच उत्तर कोरिया त्यांच्याशी सामना करण्यासाठी नेहमीच तयार असेल." असे किम यो जोंग यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे सैन्य या महिन्याच्या शेवटी सर्वात मोठा फील्ड सराव करण्याची तयारी करत आहे. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावाला उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत.

Kim Jong Un and his sister Kim Yo Jong
'RSS कट्टरतावादी, फॅसिस्ट संघटना, भाजप कायम सत्तेत राहणार नाही'; राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर हल्ला

येत्या 13 ते 23 मार्च या कालावधीत दक्षिण कोरिया आणि यूएस सैन्य संगणक-सिम्युलेटेड कमांड पोस्ट प्रशिक्षण घेणार आहेत. तसेच, 2018 मध्ये आयोजित केलेला फील्ड सराव पुन्हा करतील, असे दक्षिण कोरिया आणि यूएस सैन्याने घोषित केले आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन यांची पत्नी आणि त्यांची बहीण यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. सत्तेत राहण्यासाठी दोघांमध्ये सध्या वाद सुरू आहेत. किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हिच्याकडे उत्तर कोरियाची संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते.

तर, काही तज्ज्ञांचे असे मत आहे की किम जोंग उनला आपली मुलगी उत्तराधिकारी म्हणून पुढे घेऊन यायचे आहे आणि म्हणूनच तिला तो मीडियासमोर घेऊन आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com