North Korea Missile: उत्तर कोरियाची दादागिरी सुरूच; आणखी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली...

दक्षिण कोरियाला चिंता; जपाननेही व्यक्त केली नाराजी
North Korea | Kim Jong-un
North Korea | Kim Jong-unDainik Gomantak
Published on
Updated on

North Korea Missile: उत्तर कोरियाने त्यांच्या पुर्वेकडील समुद्रात आणखी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने या प्रकाराचा निषेध केला आहे. उत्तर कोरिया विनाकारण तणाव वाढवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या संयुक्त चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, ही दोन्ही क्षेपणास्त्रे 500 किलोमीटर पल्ल्याची आहेत.

North Korea | Kim Jong-un
Mrs World 2022: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय सुंदरीला 'मिसेस वर्ल्ड 2022'चा किताब

दरम्यान, जपानच्या संरक्षण मंत्र्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जपानच्या इकॉनॉमिक झोनबाहेर ही क्षेपणास्त्रे पडल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय निर्बंधांनंतरही या वर्षात उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. एका अहवालानुसार उत्तर कोरियाने या वर्षात सुमारे 35 क्षेपणास्त्रांचे टेस्टिंग केले आहे. गेल्याच महिन्यात उत्तर कोरियाने एका आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात अमेरिकेतील प्रमुख शहरेदेखील येतात. जपानच्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे जपानपासून 200 किलोमीटर अंतरावर पडली आहेत.

North Korea | Kim Jong-un
Bilawal Bhutto: आम्ही मोदी, RSS ला घाबरत नाही; भुट्टो पुन्हा बरळले...

दक्षिण कोरियासह अमेरिकेच्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. दक्षिण कोरियाने तत्काळ नॅशनल सिक्युरिटी काउंसिल (NSC) ची बैठकही बोलावली. अशा प्रकारे उकसविल्याने आणि अण्वस्त्रे बनविल्याने उत्तर कोरियाचेच नुकसान होईल. असे त्यांनी म्हटले आहे. गुरूवारी उत्तर कोरियाने एक ‘हाय-थ्रस्ट सॉलिड-फ्यूल इंजिन’ची चाचणी घेतली होती. या इंजिनच्या मदतीने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वेगाने लाँच केली जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com