Baltic Sea Methane Leak
Baltic Sea Methane LeakDainik Gomantak

Baltic Sea Methane Leak: बाल्टिक समुद्रात 'मिथेन बॉम्ब'चा स्फोट, नॉर्ड स्ट्रीम गळतीमुळे युरोपत हाहाकार

मिथेन गॅस पाइपलाइन नॉर्ड स्ट्रीम बाल्टिक समुद्राच्या 100 मीटर खाली फुटली आहे. त्यामुळे मिथेन वायूची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
Published on

नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइन रप्चर, बाल्टिक समुद्रातील (Baltic Sea) नैसर्गिक वायू पाइपलाइनमधून दर तासाला सुमारे 23 हजार किलो मिथेन वायूची गळती होत आहे. या गॅस गळतीचे रूपांतर गंभीर संकटात होत आहे. उत्तर युरोपमध्ये, बाल्टिक समुद्र जवळजवळ सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. गॅस गळतीमुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे. 

ही गॅस पाइपलाइन बाल्टिक समुद्रात 100 मीटर खाली आहे. 26 सप्टेंबर रोजी गॅस पाइपलाइन फुटली. त्यानंतर आतापर्यंत त्यात अनेक स्फोट झाले आहेत. अंतराळातील (Space) उपग्रहांनी गॅस पाइपलाइन फुटल्याच्या परिणामाचे फोटोही घेतले आहेत. 

* बाल्टिक सागरी परिसंस्था नष्ट होऊ शकते!

नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनचा स्फोट आणि परिणामी वायू गळतीमुळे बाल्टिक समुद्रातील परिसंस्था नष्ट होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही पाइपलाइन फुटल्याचा आरोप रशियावर होत आहे. युरोपीय देशांना होणारा इंधनाचा पुरवठा खंडित करण्यासाठी रशियाने पाइपलाइन फोडल्याचा आरोप आहे. 

Baltic Sea Methane Leak
Earth Ocean: पृथ्वीच्या मध्यभागात शास्त्रज्ञांना सापडलाय "महासागर"

मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमधून दर तासाला 22,920 किलो गॅसची गळती होत आहे. जे 2 लाख 85 हजार किलो कोळसा जाळण्याइतके आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या एक चतुर्थांश भागासाठी मिथेन वायू जबाबदार असल्याचे मानले जाते. 

* संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने ही माहिती दिली

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) ने म्हटले आहे की नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनचा स्फोट अनेक TAT बॉम्बच्या स्फोटासारखा आहे. पाइपलाइन लवकर दुरुस्त न केल्यास मोठ्या प्रमाणात सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचेल, असा विश्वास यूएनईपीने व्यक्त केला आहे. सागरी वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.  

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामने म्हटले आहे की, बाल्टिक समुद्राखालील नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन फुटणे ही हवामान-हानीकारक मिथेनची आतापर्यंतची सर्वात मोठी गळती असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com