भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, यंदा 'हे' तीन जण संयुक्तपणे ठरले मानकरी

इलेक्ट्रॉनवरील अभ्यासासाठी हा सन्मान देण्यात आला.
nobel prize in physics announced pierre agostini ferenc krausz and anne lhuillier
nobel prize in physics announced pierre agostini ferenc krausz and anne lhuillier Dainik Gomantak
Published on
Updated on

Nobel Prize 2023: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या श्रेणीसाठी 2023 चा नोबेल पारितोषिक संयुक्तपणे पियरे ऑगस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि अॅन हुलियर यांना प्रदान करण्यात आला.

इलेक्ट्रॉनवरील अभ्यासासाठी हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात आला, ज्यामध्ये पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशाच्या एटोसेकंड पल्स निर्माण केल्या गेल्या.

भौतिकशास्त्राच्या या क्षेत्रात नोबेल मिळवणाऱ्या अॅन हुलियर या पाचव्या महिला ठरल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ. क्लाउझर आणि अँटोन झेलिंगर यांना संयुक्तपणे देण्यात आले होते. अॅलेन ऍस्पेक्ट हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहेत, तर जॉन एफ. क्लाउझर हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांच्या (Scientists) प्रयोगांमुळे क्वांटम माहितीवर आधारित नवीन तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा झाला होता.

nobel prize in physics announced pierre agostini ferenc krausz and anne lhuillier
Nobel Prize 2022: अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर, बँकिंग क्षेत्रातील या 3 तज्ज्ञांना मिळाला सन्मान

कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वीसमॅन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले

याआधी काल फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी या सन्मान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. या वर्षी कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वीसमॅन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या शोधामुळे कोरोनाव्हायरस (Coronavirus) म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.

या शास्त्रज्ञांना 2021 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले

गेल्या वर्षी स्युकुरो मानाबे, क्लॉस होसेलमन आणि ज्योर्जिओ पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. जटिल भौतिक प्रणालींबद्दलची समज सुधारण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

Syukuro Manabe आणि Klaus Hoselmann यांना 'Strengthening Physical Modeling of Earth's Climate' आणि 'Prediction of Global Warming' साठी पुरस्कार मिळाला होता.

nobel prize in physics announced pierre agostini ferenc krausz and anne lhuillier
Nobel Prize In Chemistry: बेरटोझी, मेलडॉल, शार्पलेस यांना केमिस्ट्रीचे नोबेल जाहीर

त्याची सुरुवात कालपासून झाली

नोबेल पारितोषिकांची घोषणा सोमवारपासून वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सुरु झाली. आता बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

याशिवाय, नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील हा पुरस्कार विजेत्याची घोषणा 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

इतके बक्षीस मिळते

पुरस्कारांमध्ये 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर किंवा एक दशलक्ष यूएस डॉलर्स किंवा एक दशलक्ष डॉलर्सचे रोख पारितोषिक आहे. हा निधी पुरस्काराचे संस्थापक आणि स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी दिलेल्या मृत्युपत्रातून आला आहे. 1896 मध्ये त्यांचे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com