न्यूझीलंड सरकारचा मोठा निर्णय; देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर

पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
Coronavirus
CoronavirusDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंड (New Zealand) सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेत किमान तीन दिवसांसाठी देशभरात कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू केला. खरं तर, देशात सहा महिन्यांनंतर, नागरिकांमध्ये प्रथमच, कोरोनाचा रुग्ण समोर आला आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. आर्डर्न म्हणाले की, आपण पाहिले आहे की, कोरोनाने जगभरातील इतर ठिकाणी हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आपल्याकडे एकच संधी आहे.

पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संक्रमित व्यक्ती हा ऑकलंडचा रहिवासी आहे, आणि त्याने कोरोमंडलचा दौरा केला होता. या दोन्ही ठिकाणी सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला जाईल. त्याच वेळी, उर्वरित देशात, लॉकडाऊन फक्त तीन दिवसांसाठी लागू करण्यात येणार येईल. त्याच वेळी, आरोग्य अधिकारी या संसर्गाचे स्त्रोत शोधण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे, लॉकडाऊन जाहीर होताच लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.

Coronavirus
कोरोना कसा पसरला? चीनने WHO ला आकडे देण्यास दिला नकार

सहा महिन्यापूर्वी सापडला होता कोरोना रुग्ण

विशेष म्हणजे न्यूझीलंडमधील (New Zealand) सर्वात मोठे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये (Auckland) एका व्यक्तीला कोरोनाची (Covid-19) लागण झाल्याचे आढळून आले. अशाप्रकारे, कोरोनाचा पहिला रुग्ण न्यूझीलंडमध्ये सहा महिन्यांनंतर समोर आले. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्याच्या प्रमाणात सोयीयुविधा याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही. या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला याची चौकशी केली जात आहे. न्यूझीलंडमधील लोकांमध्ये कोरोनाचा शेवटचा रुग्ण फेब्रुवारीमध्ये आढलला होता.

Coronavirus
श्रीमंत देशांनी कोरोना लसीच्या 'बूस्टर डोस' ला स्थगिती द्यावी: WHO च आवाहन

ऑकलंडचे स्थानिक सार्वजनिक आरोग्य युनिट संक्रमित व्यक्तीशी संवाद साधला आहे. जेणेकरून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की जो कोणी ऑकलंडमध्ये सार्वजनिक वाहनामधून प्रवास करत असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर पाळू शकत नाही. त्यांना खबरदारी म्हणून मास्क घालणे आवश्यक करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या प्रतिसादाची पुष्टी करण्यासाठी अतिरिक्त माहिती गोळा केल्यानंतर आज दुपारी मंत्रीमंडळाची बैठक होईल.

26 लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला

न्यूझीलंडने कोरोनाव्हायरस साथीच्या रोगावर कठोर पावले उचलल्यामुळे, स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यात काहीस यश आले आहे. हेच कारण आहे की देशातील नागरिक कोणत्याही निर्बंधांशिवाय कुठेही प्रवास करता येऊ शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय सीमांवर अद्याप बंदी आहे. आतापर्यंत, न्यूझीलंडमध्ये सुमारे 2500 लोकांना कोरोनाची लागण (Coronavirus Cases in New Zealand) झाल्याची पुष्टी झाली आहे, आणि या संसर्गामुळे 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus
चीनने ‘या’ कारणासाठी दिला माजी बॅंकरला मृत्यूदंड

यूएस आठ महिन्यांत बूस्टर डोसची शिफारस करेल

त्याच वेळी, अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हरिएंटचा झपाट्याने पसरण्याच्या पार्श्वभूमीवर, कोविड -19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीनंतर अमेरिकन तज्ञ सर्व अमेरिकन लोकांना बूस्टर डोसची शिफारस करत आहेत. फेडरल हेल्थ ऑफिसर्स सक्रियपणे विचार करत आहेत की, लोकांना या हिवाळ्यात अतिरिक्त डोस देण्याची आवश्यकता आहे का ते.

ते अमेरिकेत संक्रमणाची संख्या आणि इस्त्रायल सारख्या इतर देशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, जिथे प्राथमिक अभ्यासांमध्ये असे सूचित केले आहे की, जानेवारीत लसीकरण झालेल्या लोकांमध्ये लसीचा गंभीर संसर्गापासून बचाव कमी झाला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अमेरिकेत बूस्टरची शिफारस या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com