'ओमिक्रॉनचा प्रसार होऊ द्या, सर्वांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती होईल विकसित'

या दाव्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येईल का? काय आहे डॉक्टरांच मत?
Omicron variant

Omicron variant

Dainik Gomantak

Published on
Updated on

ओमिक्रॉनने जगभरात हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर अभ्यासक सांगतात की ओमिक्रॉन लोकांमध्ये वेगाने पसरत आहे, ज्यामुळे नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत वैज्ञानिकांनी कोणताही मोठा दावा केलेला नाही. जर आपण दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची रूग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची प्रकरणे खूपच कमी आहेत.

दरम्यान, अनेक डॉक्टरांकडून असा दावा केला जात आहे की ओमिक्रॉन खूपच कमी प्राणघातक आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि कर्फ्यू लादून हे थांबवण्याऐवजी सरकारने त्याचा प्रसार संपूर्ण लोकांमध्ये होऊ द्यावा. ज्या डॉक्टरांच्या वतीने हे सांगण्यात आले आहे, त्यापैकी एक मोठे नाव अमेरिकन डॉक्टर फशाइन इम्रानीचे आहे, जे लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील सुप्रसिद्ध हृदयरोग विशेषज्ञ आहेत आणि त्यांनी कोरोना महामारीच्या काळात शेकडो कोरोना रुग्णांना हाताळण्यात मदत केली आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron variant </p></div>
'ह्युमन-चिंपांझी' चे क्रॉस-ब्रीडिंग करुन चीन बनवतोय 'सुपरमॅन'

काय आहे डॉक्टरांच मत?

डॉ. इम्रानींसह इतर अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन (omicron) प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा खूपच कमी प्राणघातक आहे. त्याच्या कमी प्राणघातकतेमुळे, लोक गंभीर आजारी होणार नाहीत किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही.

यूके आणि दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य (Health) विभागाच्या अभ्यासात असेही म्हटले आहे की ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना इतर प्रकारांपेक्षा 70 टक्के कमी हॉस्पिटलची आवश्यकता असते.

एवढेच नाही तर ओमिक्रॉनमुळे लोकांचा मृत्यू होण्याची शक्यताही खूप कमी आहे. यासोबतच त्यांच्यामध्ये कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्तीही विकसित होईल, जी दीर्घकाळ राहील आणि इथूनच कोरोना महामारीचा अंत सुरू होईल.

<div class="paragraphs"><p>Omicron variant </p></div>
'या' राज्यात पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी होणार स्वस्त, पण अटी लागू!

शास्त्रज्ञांनी असे म्हणण्यामागे काय आहे कारण ?

ओमिक्रॉन प्रकार हवेत डेल्टाच्या तुलनेत 70 पट वेगाने जात असल्याने, त्याचा प्रसार वेग लक्षणीय आहे. परंतु ते डेल्टा प्रकाराप्रमाणे लोकांना आजारी का बनवत नाही यामागील संशोधनात आतापर्यंत असे आढळून आले आहे की, ओमिक्रॉन प्रकार ब्रॉन्कसमध्ये, फुफ्फुसावर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

डॉक्टरांचा असा दावा आहे की ओमिक्रॉन फुफ्फुसात पोहोचतो आणि डेल्टाच्या तुलनेत खूपच कमी वेगाने संसर्ग पसरतो. त्यामुळे ओमिक्रॉन संक्रमित लोकांना ऑक्सिजनच्या आधाराची गरज नसते. याशिवाय, आपल्या श्वासनलिकेमध्ये श्लेष्मल रोगप्रतिकारक शक्ती देखील असते, जी रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे ओमिक्रॉनचा प्रसार सुरू होताच, हे आपोआप सक्रिय होते आणि त्यातून बाहेर पडणारे अँटीबॉडीज ओमिक्रॉनला मारून टाकतात. म्हणजेच, ओमिक्रॉन शरीरातच एक गंभीर रोग म्हणून वाढू शकत नाही.

डॉ. इम्रानीचे म्हणणे आहे की असे म्हणता येणार नाही की ओमिक्रॉनमुळे मृत्यू होणार नाही, आधीच काही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांवर परिणाम होऊ शकतो, परंतु निरोगी लोकांना जास्त समस्या येत नाहीत. त्याचप्रमाणे, ओमिक्रॉन ही नैसर्गिक लस बनेल आणि महामारीचा अंत निश्चित आहे.

या दाव्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येईल का?

विशेष म्हणजे, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अनेक दावे करण्यात आले होते. यामध्ये डॉ. इम्रानींसह जगभरातील इतर अनेक शास्त्रज्ञांच्या दाव्यांचा समावेश होता. कोरोनाचे (Corona) रुग्ण आणि मृत्यू रोखण्यासाठी लॉकडाऊनचा फारसा फायदा होणार नाही, असे तेव्हा सांगण्यात आले आणि स्वीडनने लॉकडाऊन न लागू करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. डॉ इम्रानीने तरुण आणि निरोगी लोकांना लसीकरण न करण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, नंतर त्याचे दावे खोटे ठरले. याचे सर्वात मोठे उदाहरण स्वीडनमध्येच दिसले, जिथे सरकारने लॉकडाउन लादण्यास नकार दिला आणि सर्व चालू ठेवल. याचा परिणाम असा झाला की स्वीडनला त्याच्या शेजारील देशांच्या (नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्क) तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. जेथे नॉर्वेमध्ये (प्रति दशलक्ष) म्हणजे दहा लाख लोकांपैकी केवळ 2699 लोकांना संसर्ग झाला होता, तर स्वीडनमध्ये 10 लाख लोकांमध्ये 10 हजार लोक संक्रमित आढळले. म्हणजेच नॉर्वेच्या चौपट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com