New Pope Selection: पोप फ्रान्सिस यांच्यानंतर नवीन पोप कोण होणार? कशी होते निवड, काय असे प्रक्रिया? वाचा सविस्तर

Pope Francis Dies: कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. न्यूमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
New Pope Selection
New Pope SelectionDainik Gomantak
Published on
Updated on

व्हॅटिकन: कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. न्यूमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कॅथोलिक समुदायावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या उत्तराधिकारी म्हणजेच नवीन पोप कोण होणार? याकडे लागलं आहे.

२०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर पोप फ्रान्सिस या नावाने ओळखले गेलेले कार्डिनल जोर्ज मारियो बेर्गोलियो हे 'पोप'पदी विराजमान झाले. ते पहिल्या दक्षिण अमेरिकन खंडातून पोपपदी आलेले धर्मगुरू होते. त्यांच्या कार्यकाळात, चर्चच्या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी सामाजिक न्याय, पर्यावरण रक्षण आणि गरीबांच्या कल्याणासाठी अनेक अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता नव्या पोपची निवड ही कॅथोलिक चर्चसमोरची महत्त्वाची प्रक्रिया ठरणार आहे. ही निवड कॉन्क्लेव्हद्वारे केली जाणार आहे, जिथे जगभरातील कार्डिनल्स कॉलेजचे सदस्य व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपलमध्ये एकत्र येऊन मतदान करतील.

New Pope Selection
Goa: विकसित भारत, विकसित गुजरातशी गोवा सुसंगत! अहमदाबाद येथे झालेल्या EDII च्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

पोप पदासाठी दावेदार कोण?

लुईस अँटोनीयो टॅगल: लुईस अँटोनीयो टॅगल हे फिलिपिन्समधील अत्यंत प्रभावशाली कार्डिनल म्हणून ओळखले जातात. २०२० मध्ये त्यांना कार्डिनल-बिशप या सर्वोच्च दर्जाची बढती देण्यात आली होती. त्यांनी रोममध्ये चर्च सरकारच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. यामुळे ते 'पोप' पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन: कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन हे अत्यंत अनुभवी आणि चर्चच्या राजनैतिक व्यवहारात पारंगत असे नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून ते व्हॅटिकनचे राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत, आणि हे पद चर्चच्या प्रशासनातील पोपनंतरचं सर्वात महत्त्वाचं पद मानलं जातं. त्यामुळे त्यांचंही नाव 'पोप'पदासाठी चर्चेत आहे.

पिएत्रो पॅरोलिन: पिएत्रो पॅरोलिन यांनी नायजेरियन नन्सिएचर आणि मेक्सिकन नन्सिएचरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली. या अनुभवामुळे त्यांनी चर्च आणि स्थानिक सरकारांमधील संबंध मजबूत करण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. २०१४ मध्ये त्यांना कार्डिनलपदाची बढती देण्यात आली, आणि त्यानंतर ते पोप फ्रान्सिस यांच्या धोरणांना आणि विचारधारेला पाठिंबा देणारे अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जात आहेत. ज्यामुळे ते 'पोप' पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

कार्डिनल पीटर एर्डो: कार्डिनल पीटर एर्डो हे हंगेरियन धर्मगुरू असून त्यांना युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित आणि पारंपरिक विचारसरणीचे कार्डिनल म्हणून ओळखलं जातं. त्यांनी युरोपियन बिशप कॉन्फरन्स कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवलंय. एर्डो यांना एक 'मारियन कार्डिनल' म्हणून ओळखलं जातं.

मॅटेओ झुप्पी: कार्डिनल मॅटेओ झुप्पी हे इटलीच्या एपिस्कोपल परिषदेचे प्रमुख आहेत आणि पोप फ्रान्सिस यांचे एक जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. मे २०२२ पासून त्यांनी इटलीच्या चर्चचे नेतृत्व घेतले आहे. पोप'पदासाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे.

New Pope Selection
Goa Drugs Case: 43 कोटींच्या कोकेनसाठी रक्कम आली कुठून? संशयितांना कोठडी वाढीसाठी करणार न्यायालयात उभे

पोप पदासाठी इतर संभाव्य उमेदवारांची नावं

  • गेरहार्ड मुलर

  • अँजेलो स्कोला

  • अँजेलो बॅग्नास्को

  • रेमंड बर्क

  • रॉबर्ट सारा

  • माल्कम रंजीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com