Nepal Flood: देव तारी त्याला कोण मारी! 9 दिवस अंधाऱ्या बोगद्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश; आतापर्यंत 1,259 जणांचा मृत्यू, 5,000 नागरिक अजूनही बेपत्ता VIDEO

Nepal Flood Rescue Video: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.
Nepal Flood Rescue Video
Nepal Flood Rescue VideoDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. पुरानंतर सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. त्रिशूली-3 ‘ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या व्यक्तीला तब्बल नऊ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. नेपाळी लष्कराने या बचावकार्याची माहिती दिली आहे. दरम्यान, पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या 1,259 वर पोहोचली असून सुमारे 5 हजार लोक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरंगीतून आवाज ऐकू आला अन् शोधमोहीमेला वेग

नेपाळी लष्कराच्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी बोगद्यात शोधमोहीम सुरू असताना आतून एखाद्या व्यक्तीचा आवाज किंवा हालचालींचे संकेत बचाव पथकाला मिळाले. त्यानंतर जवान आणि बचाव कर्मचाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध अधिक वेगाने सुरू केला. काही काळाच्या प्रयत्नांनंतर एका व्यक्तीला जिवंत अवस्थेत सुरंगीतून बाहेर काढण्यात आले.

नऊ दिवसांनंतर सुटका

26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात काही लोक अडकले होते. पुराचे पाणी, ढिगारा आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले होते. अशा परिस्थितीत नऊ दिवसांनंतर एका व्यक्तीचा शोध लागणे हे बचाव पथकासाठी मोठे यश मानले जात आहे. बोगद्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध अद्याप सुरू आहे.

Nepal Flood Rescue Video
Goa POP Idol Ban: 'पीओपी' मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई! गेल्या वर्षी 27 गुन्हे; 20 टक्क्यांहून अधिक 'पीओपी'वर बंदी

मृतांचा आकडा 1,259 वर

पुरामुळे नेपाळच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रभावित भागांमधून बचाव पथकांना सातत्याने मृतदेह सापडत असल्याने मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत किमान 1,259 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे आपत्कालीन पथकांनी आतापर्यंत 12 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, जवळपास 5 हजार नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी भारताची मदत

नेपाळमधील मृतांची ओळख पटवण्यासाठी भारत सरकारनेही मदतीचा हात पुढे केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी भारतात राहणाऱ्या त्यांच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांची DNA प्रोफाइल तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरीय फॉरेन्सिक प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नातेवाईकांचे DNA नमुने घेणार

मृत व्यक्तीचे आई-वडील, मुलगा-मुलगी किंवा भाऊ-बहिण यांसारखे जवळचे जैविक नातेवाईक DNA चाचणीसाठी नमुने देऊ शकतात. यासाठी केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा, राज्य फॉरेन्सिक प्रयोगशाळा, नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळा तसेच DNA प्रोफाइलिंगची सुविधा असलेल्या NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचा वापर करता येणार आहे.

Nepal Flood Rescue Video
Goa Coastal Zone Management Plan: गोव्याचा सीआरझेड आराखडा तयार, पण अंतिम मंजुरी बाकी; महिनाभरात हरकती-सूचनांसाठी खुला होणार?

DNA नमुने नेपाळी अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची व्यवस्था

भारत सरकारच्या माहितीनुसार, DNA प्रोफाइल तयार झाल्यानंतर आवश्यक प्राथमिक माहितीसह ते नेपाळ पोलिसांकडे पाठवता येतील. त्यानंतर अज्ञात मृतदेहांकडून मिळालेल्या DNA प्रोफाइलशी त्यांची तुलना करून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकांबाबत अधिकृत माहिती मिळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

शोध आणि बचावकार्य अजूनही सुरू

नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी मोठ्या संख्येने नागरिक बेपत्ता असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान कायम आहे. सुरंगीतून नऊ दिवसांनी व्यक्ती जिवंत सापडल्याने बचाव पथकांच्या प्रयत्नांना नवी आशा मिळाली आहे. आता सुरंग आणि इतर प्रभावित भागांमध्ये आणखी कोणी अडकले आहे का, यासाठी युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com