

पणजी: राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती तयार करणे तसेच राज्याबाहेरून त्यांची आयात करण्यावर बंदी असतानाही काही विक्रेत्यांकडून मूर्तींची विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कारवाई करण्यात येत असून, गेल्या वर्षी २७ ‘पीओपी’ मूर्ती विक्रेत्यांवर गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.
राज्यात ‘पीओपी’ मूर्ती तयार करणे, आयात करणे अथवा विक्री केल्यास कोणती कारवाई करावी, यासंदर्भातील अधिसूचना २००८ मध्ये राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून राज्यातील चित्रशाळांमधील मूर्तींची तपासणी केली जाते. चाचणीत निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक ‘पीओपी’ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातात.
मूर्ती आढळल्यास २५ हजार रुपये दंड
११ ऑगस्ट २०२६ पासून २० टक्क्यांहून अधिक ‘पीओपी’ वापरलेल्या मूर्तींवर बंदी आहे. अशा मूर्ती आढळल्यास विक्रेत्याला २५ हजार रुपये दंड होईल. १५ दिवसांत मूर्ती विघटन केंद्रात जमा केल्याचे प्रमाणपत्र न दिल्यास ५० हजार रुपये अतिरिक्त दंड करून दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.