NASA's Artemis III Mission is Being Prepared to Step on The Moon For Second Time After 50 Years:
भारताच्या चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, 50 वर्षांनंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे.
नासाने पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी शास्त्रज्ञांच्या पथकाची निवड केली आहे, जी मोहिमेसाठी धोरण तयार करेल.
विशेष म्हणजे १९६९ मध्ये मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्यावेळी नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे साथीदार गेले. परंतु, 1972 नंतर चंद्रावर एकही मानव मोहीम पाठविली गेली नाही.
नासाचे म्हणणे आहे की शास्त्रज्ञांना चंद्रावर लोकांची वसाहत करण्यासाठी संशोधन करायचे आहे. त्यामुळे नासाची आर्टेमिस III मोहीम चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे.
यासोबतच नासा चंद्रावर पाठवणाऱ्या पथकामध्ये महिलांचाही समावेश करणार आहे. हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ पाठवले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नासाचे सायन्सचे सहयोगी प्रशासक डॉ. निकी फॉक्स म्हणाले की, विज्ञान आर्टेमिसच्या स्तंभांपैकी एक आहे. ते म्हणाले की, शास्त्रज्ञांचे पथक 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवांना चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करेल
डॉ. ब्रेट डेनेवे यांच्या नेतृत्वाखाली आर्टेमिस-III भूगर्भशास्त्र पथक, मिशनच्या भूगर्भीय विज्ञान उद्दिष्टांचा शोध घेण्यासाठी आणि पृष्ठभाग भूविज्ञान मोहिमेची रचना करण्यासाठी एजन्सीसोबत काम करेल.
महत्त्वाचे म्हणजे, इनसाइड आऊटर स्पेसचे लिओनार्ड डेव्हिड यांच्या मते, चंद्राच्या पृष्ठभागाच्या काही भागांवर सूक्ष्मजीवांवरील अलीकडील संशोधनामध्ये अनेक सूक्ष्मजीवांच्या उपस्थितीबद्दल सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
संशोधकांना असे आढळून आले की डीनोकोकस रेडिओडुरन्स नावाचा जीवाणू आंतरराष्ट्रीयअंतराळ स्थानकाच्या बाहेर एक वर्षापर्यंत जगला.
तर, प्रबल सक्सेना म्हणतात की आम्ही सध्या अशा भागात टिकून राहण्यासाठी कोणते विशिष्ट जीव सर्वात योग्य असू शकतात हे समजून घेण्यावर काम करत आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.