NASA Chief on China: नासाच्या प्रमुखांना चीनबाबत वाटतेय ही भीती; चीनी चांद्रमोहिमेबाबत दिला इशारा...

दक्षिण चीन समुद्रातील स्प्रॅटली बेटांचे उदाहरण देत चीनवर साधला निशाणा
NASA Chief on China
NASA Chief on ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

NASA Chief on China: रशियाने सर्वप्रथम अंतराळात उपग्रह पाठवल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात अघोषित अंतराळ स्पर्धा सुरू झाली होती. आताच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यात अशी अंतराळ स्पर्धा तीव्र होत चालली आहे. चीन आणि अमेरिका यांच्या चंद्रावर जाण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही शर्यत कोण जिंकणार ते कळणार आहे. तथापि, ही शर्यत चीनने जिंकली तर चीन चंद्राच्या विशाल भागावर दावा करू शकेल, असे मत अमेरिकेचे अंतराळ संशोधन संस्था नासा चे प्रमुख बिल नेल्सन यांनी केली आहे.

NASA Chief on China
Pakistan: मोठा खुलासा, पाकचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा हिरोइन्ससोबत करायचे 'सेक्स'

बिल नेल्सन हे फ्लोरिडाचे माजी सिनेटर आणि अंतराळवीर आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या आक्रमकतेचे उदाहरण देऊन नेल्सन यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. ते म्हणाले, “हे खरं आहे. आम्ही अंतराळ शर्यतीत आहोत. चीन चंद्रावर दावा करू शकतो हे अगदीच अशक्य नाही. संशोधनाच्या बहाण्याने तो चंद्राचा प्रचंड भाग बळकावू शकतो. चीन सरकारने नियमितपणे इतर देशांच्या भूभागावर सार्वभौमत्वाचा दावा केला आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर शंका असेल तर त्यांनी स्प्रेटली बेटांचे काय केले ते तुम्हीच पाहा."

चीनने स्पेस गव्हर्नन्स सिस्टमची रूपरेषा तयार केली आहे. चीनच्या आक्रमक अंतराळ कार्यक्रमामध्ये नुकतेच नवीन स्पेस स्टेशनचे प्रक्षेपण देखील समाविष्ट आहे. बीजिंगला या दशकाच्या अखेरीस आपले अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची आशा आहे. डिसेंबरमध्ये, चीन सरकारने अंतराळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि अंतराळ प्रशासन प्रणालीच्या स्थापनेसाठी आपल्या योजनांची रूपरेषा देखील दिली.

NASA Chief on China
Senegal's Parliament Video: धक्कादायक! भर संसदेत गरोदर महिलेच्या पोटावर मारली लाथ

नासा आपल्या चंद्र मोहिमांच्या आर्टेमिस लाइनवर काम करत आहे. 11 डिसेंबर रोजी, नासाचे ओरियन अंतराळ यान पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे खाली उतरले आणि आर्टेमिस 1 मोहिमेचा शेवट झाला. 25 दिवसांपेक्षा जास्त काळ हे मिशन चालले. काही वर्षांत लोकांना चंद्रावर परतण्यासाठी ते डिझाइन केले गेले होते. नासाच्या फुटेजनुसार, मानवरहित कॅप्सूल ताशी 40,000 किलोमीटर वेगाने वातावरणाला छेदून तीन प्रचंड लाल आणि पांढर्‍या पॅराशूटच्या मदतीने समुद्रात उतरले. अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देश हायपरसोनिक शस्त्रे विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत. त्यातच चीनने अंतराळ प्रवास आणि इतर रॉकेट तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com