SCO मध्ये PM मोदींनी दिला रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना '3 D' चा मंत्र

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली.
Prime Minister Narendra Modi & President Vladimir Putin
Prime Minister Narendra Modi & President Vladimir PutinTwitter/ @ANI
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi & President Vladimir Putin: समरकंदमध्ये होत असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. 'हे युग युद्धाचे नाही', असे स्पष्टपणे पंतप्रधान मोदींनी चर्चेदरम्यान सांगितले. डेमॉक्रसी, डिप्लोमसी आणि डायलॉग यातूनच जगाला योग्य संदेश मिळेल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर ऊर्जा-सुरक्षेबाबतही यावेळी चर्चा झाली. आधी ही चर्चा अर्धा तास चालणार होती, मात्र पुढे ही चर्चा सुमारे तासभर चालली.

Prime Minister Narendra Modi & President Vladimir Putin
SCO Summit 2022: गलवान संघर्षानंतर PM मोदी अन् शी जिनपिंग आमनेसामने, पुतीन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक

विशेष म्हणजे, लष्करी उपकरणे आणि तेलाचा व्यापार हा भारत आणि रशियामधील (Russia) मुख्य व्यापार आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा पीएम मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे लागल्या होत्या. पाकिस्तानने (Pakistan) अलीकडेच भारतासोबत व्यापारी संबंध पूर्ववत करण्याचे संकेत दिले होते. मात्र भारताने (India) यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचबरोबर दहशतवाद, सीमावाद यासह अनेक मुद्द्यांवर भारताचा चीनशी संघर्ष आहे.

Prime Minister Narendra Modi & President Vladimir Putin
Pakistan PM: पुतिन यांच्यासमोर पीएम शरीफ यांचा उडाला गोंधळ, पुतिन यांना हसू आवरेना

एससीओची सुरुवात

जून 2001 मध्ये शांघायमध्ये एससीओची सुरुवात झाली. चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देश त्याचे सहा संस्थापक आहेत. तर भारत आणि पाकिस्तान हे या संघटनेचे पूर्णवेळ सदस्य आहेत. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे एससीओचा भाग झाले. SCO ही सर्वात मोठी आंतर-प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com